वाळू वाहतूकीची माहिती देणारा खबऱ्या समजून एकास मारहाण ; पोलीसात गुन्हा दाखल 

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यातून जाणाऱ्या गोदावरी नदीला वाळू माफियांची वाकडी नजर लागल्याचे दिसते अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियाकडून सर्व सामान्य नागरिकांना धमकावण्याचे प्रकार वाढले आहेत योग्य त्या वेळी जिल्हा महसुल विभागाने ठोस कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या गोदावरी नदी पात्रातून पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, तालुक्यातील वाळू घाटातून रेती माफियांनी अवैधरीत्या रेती उपसा करून रेतीचे भाव गगनाला भिडवले आहेत. योग्य ती खबरदारी महसुल विभागाने घेतली नसल्याने गोदावरी नदीच्या पात्रात वाळू माफियांचा एक प्रकारे गुंडाराज चालू असल्याचे दिसते.
वाळूची वाहतूक होत असलेल्या रस्त्याने जाताना वाळू वाहतूकीची माहिती देणारा खबऱ्या समजून अंगद चोरघडे यांना अज्ञातानी मारहाण केल्याची हि घटना (गंगाखेड) तालुक्यात धारखेड येथील शेतात २८ एप्रिल रोजी रविवारी साडे नऊ वाजता घडल्याने अज्ञातावर मारहाण केल्या प्रकरणी गंगाखेड, पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला