सेवा विकास बँकेत कोट्यावधीचा ‘घोटाळा’ ; संचालक मंडळावर गुन्हा दाखल

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड तसेच पुणे शहरामध्ये असलेल्या दि. सेवा विकास को-ऑप. बँक लि. मध्ये संचालक मंडळाने कोट्यवधींचा अपहार केला असल्याची तक्रार धनराज नथुराम आसवानी (वय-५८) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात केली आहे. त्यांच्या फिर्य़ादेवरून पिंपरी पोलिसांनी दि. सेवा विकास बँकेचे अधिकारी, पदाधिकारी यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सन २०१० ते २०१९ दरम्यान घडला आहे.

धनराज आसवानी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बँकेचे अधिकारी आणि पदाधिकारी तसेच इतर कर्जदारांनी बँकेची २३८ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. बँकेच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी योग्य कर्जदारांना कर्ज पुरवठा न केल्याने बँकेचे पैसे थकले. त्यामुळे बँकेच्या भागधारकांना मागील तीन वर्षापासून डिव्हीडंटची रक्कम मिळालेली नाही.

तसेच बँकेच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी आर.बी.आय. च्या परिपत्रकीय निर्देशनांचे उल्लंघन करून अयोग्य पद्धतीने कर्ज वाटप केले असल्याचे तक्रारीत आसवानी यांनी म्हटले आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –