धुळे : पॉलिशच्या बहाण्याने महिलेचे दागिने लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – पॉलिशच्या बहाण्याने घरात आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या अंगावरील दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना देवपुर येथील राजेश्वरी नगर येथे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मंगला चव्हाण ही वृद्ध महिला घरात असताना दोन तरुण आले. त्यांना दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने महिलेचे दागिने घेतले. चोरट्यांनी वृद्ध महिलेकडून चार सोन्याच्या बांगड्या, मंगळसुत्र असा एकूण १० ते १२ तोळे सोन्याचे दागिने घेतले. पॉलिशच्या बहाण्याने हात चलाखीने महिलेचे दागिने लुटून नेले.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मंगला चव्हाण यांच्याकडे चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी आरोपीचे वर्णन पोलिसांना सांगितले. चोरट्यांपैकी एकाने अंगामध्यो चौकडी रंगाचा शर्ट घातला होता तर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर लांब दाढी असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. मिळालेल्या वर्णनानुसार पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.