वैभव पिचड देणार आमदारकीचा राजीनामा, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची उपस्थिती

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड उद्या आमदाराकीचा राजीनामा देणार आहेत. ते पुढील आठवड्यात भाजपात प्रवेश करणार आहेत. ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड हेही आज झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपस्थित होते.

भाजपात प्रवेश करण्याची तयारी करणारे आ. वैभव पिचड यांनी आज अकोले येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड ही उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना आ. वैभव पिचड यांनी उद्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. तसेच
१७ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांची अकोल्यात सभा घेतली जाणार आहे.

आजच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक व शरद पवार यांचे निकटवर्तीय ज्येष्ठ नेते मधुकर पिचड हे उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर हेही ही आजच्या बैठकीस उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –