धक्कादायक ! न्यूज अँकरची गोळ्या घालून हत्या, हल्लखोराचा देखील मृत्यू

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – पाकिस्तानमधील एका न्यूज अँकरची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मुरीद अब्बास असे मृताचे नाव असून त्याचा कराचीमधील खैबन-ए-बुखारी भागात एका व्यक्तीशी त्याचा वाद झाला. त्यानंतर त्या व्यक्तीने त्याची गोळ्या घालून हत्या केली. घटना घडल्यानंतर तात्काळ त्याला दवाखान्यात नेण्यात आले, मात्र उपचारादम्यान त्याचा मृत्यू झाला. गोळ्या मारल्यानंतर हल्लेखोराने देखील स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरीद अब्बास हे न्यूज अँकर बोल या न्यूज चॅनलसाठी काम करत होता. या व्यक्तीने न्यूज अँकरवर गोळी झाडल्यानंतर पोलीस त्याला अटक करण्यासाठी त्याच्या घरी गेले असता त्याने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. आरोपीने या न्यूज अँकरवर केलेल्या हल्ल्यात त्याचा मित्रदेखील जखमी झाला असून त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरु आहेत. आतिफ असे या हल्लेखोराचे नाव असून हा मुरीद अब्बास यांचा बिझनेस पार्टनर होता. त्यांच्यामध्ये व्यावसायिक कारणांवरून मतभेद होते. त्यामुळेच मुरीद अब्बास यांचा खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी या घटनेचा निषेध केला असून या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. मृतकाची पत्नी जारा अब्बास देखील न्यूज अँकर असून त्याच वाहिनीवर त्या काम करतात.

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

You might also like