आयुष्यात दोनच वेळा डोळ्यात पाणी आलं, एकदा अण्णा गेले म्हणून तर दुसर्‍यांदा आणलं गेलं.. : आ. राहुल कुल

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – आयुष्यामध्ये दोनच वेळा अति दुःखाने माझ्या डोळ्यात पाणी आले होते असा खुलासा दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी वरवंड येथील भर सभेत केला. कुल यांनी याबाबत माहिती देताना एकदा अण्णा गेले त्यावेळी आपल्या डोळ्यात अति दुःखाने पाणी आले होते तर दुसऱ्यांदा मात्र ज्यावेळी आम्ही पूर्ण ताकदीने जिल्हाबँकेची तयारी सुरू केली आणि मोठ्या फरकाने विजय होणार असे वाटत असतानाच मागील दाराने आलेल्यांमुळे अचानक माघार घेण्याचा आदेश देण्यात आला त्यावेळी मात्र डोळ्यात पाणी आणण्यात आले आणि त्याच वेळी आपला फक्त वापर होत असल्याची जाणीव मला झाली होती तरीही पक्षाचा आणि पक्ष श्रेष्ठींचा आदेश म्हणून सर्व निमूटपणे सहन करत राहिलो आणि त्याची फळे २००९ ला पाठीत खंजीर खुपसून मिळाली त्यामुळे राज्यातील अनेक नेतेमंडळींनी जो निर्णय २०१९ मध्ये घेतला तो आम्ही मात्र २००९ लाच घेतला आणि त्यामुळेच २०१४ ची निवडणूक आपल्यासाठी सोपी झाली असे मत आ.राहुल कुल यांनी मांडले.

पुढे बोलताना त्यांनी धनगर व मराठा आरक्षणासाठी मी विधानसभेत अनेकदा तारांकित व लक्षवेधी प्रश्न उपस्थित केले. सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले. धनगर समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी व त्याचा अभ्यास करण्यासाठी एका संस्थेला काम दिले. धनगर आरक्षणाचे 90 टक्के काम झाले आहे. आरक्षण मिळेपर्यंत आदिवासींना मिळणाऱ्या सवलती लागू करण्यासाठी सरकारने एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती त्यांनी शेवटी दिली. या वेळी तानाजी दिवेकर, नंदू पवार, महेश भागवत, आरपीआयचे नागसेन धेंडे, वसंत साळुंके आदी उपस्थित होते.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी