home page top 1

महाराष्ट्र बँकेच्या कारभाराविरोधात भाजपा महीला आघाडीकडुन आंदोलनाचा इशारा

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – जेजुरीतील महाराष्ट्र बँकेत सध्या अंदाधुंद कारभार चालू असुन, बँकेतील स्टाफ अमराठी असल्याने सर्वसामान्य शेतकरी वर्गाची कुचंबणा होत आहे, महाराष्ट्र बँक ही महाराष्ट्राची बँक असल्याने त्या ठिकाणी किमान मराठी बोलता येणारे कर्मचारी असावेत अशी अपेक्षा आहे आणि नागरिकांसाठी बँकेची वेळ सकाळी दहा ते दुपारी साडेतीन वाजता असताना बँकेत मात्र दुपारी अडीच नंतर येणाऱ्या ग्राहकांना परत पाठवले जाते.

केंद्र सरकारच्या अनेक योजना सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आहेत, मुद्रा लोन, पेन्शन योजना, सुकन्या योजना राबविणे गरजेचे असताना कामाचा त्रास नको म्हणून सदर सरकारी योजनांची माहिती लोकांना दिली जात नाही, त्यामुळे सदर योजनांपासून नागरीक वंचित राहत आहेत असा आरोप करीत, यामध्ये सुधारणा न झाल्यास भाजपाच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष अलका शिंदे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

Visit – policenama.com 

Loading...
You might also like