गुढीपाडव्या निमित्‍त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 3 किलो सोन्याचं उपरणं अर्पण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुढीपाडव्या निमित्‍त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 3 किलो वजनाचे सोन्याचे उपरणे अर्पण करण्यात आले आहे. ‘व्यंकटेश हॅचरिज’ चे प्रमुख व्यंकटेश राव यांनी हे उपरणे दगडूशेठ गणपतीला अर्पण केले आहे. गढीपाडव्या निमित्‍त दगडूशेठ मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झालेली होती. हजारो भाविक पारंपारिक वेष परिधान करून बाप्पांच्या दर्शनासाठी आले होते.

दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दागिन्यांमध्ये सोन्याच्या उपरण्याची कमतरता होती. आता ती पूर्ण झाली आहे. हे उपरणे धरून दगडूशेठ हवालई गणपतीकडे 100 किलो सोन्याचे दागिने झाले आहेत. व्यंकटेश राव यांनी सोन्याचे उपरणे अर्पण केले त्यावेळी दगडूशेठ ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. संपुर्ण महाराष्ट्रातुन गुढीपाडव्या निमित्‍त श्रीमंत दगडूशेठ हवालईचे दर्शन घेण्यासाठी मोठया संख्येने भाविक पुण्यात येतात. त्यामुळे मंडई, एबीसी चौक, शनिवार वाडा आणि मंदिरालगतच्या परिसरात मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी काही काळातच कोंडी सोडविली.