राज्यात आगामी २ दिवस पावसाचा ‘जोर’ कायम राहणार, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईसह इतर जागेंवर मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर पाण्याचे प्रमाण वाढले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र वाढले आहे. तर अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग वाढला आहे, त्यामुळे मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर वाढल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. हा दाब पुढील २-३ दिवस कायम असणार आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

मुंबईतील कल्याण, वसई, विरार, नवी मुंबई, पालघऱ जिल्ह्यात दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरु झाला आहे. मात्र तो आता थांबण्याचे नाव घेत नाहीये. पुढचे दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. मागील २४ तासात कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून महाराष्ट्र आणि वदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, दिल्ली, बिहार आणि उत्तरप्रदेशमध्येही जोरदार पाऊस सुरु आहे. येथेही पुढील दोन दिवसांत हा पाऊस कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितलं आहे.

उद्यापासून ३ ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असून कोकणात बुधवापर्यंत (३१ जुलै) मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. पुणे आणि परिसरात महिनाअखेरीपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. पुढील चार दिवस विदर्भ आणि मराठवाडय़ामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दमरम्यान, भारतातील ओडिसा, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. राज्यातही सुट्टी घेतलेल्या पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्यानुसार हा पाऊस पुढील १०-१२ दिवस राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे.

आरोग्यविषयक वृत्त –