NIA Raids In Mumbai | NIA ची मुंबईत मोठी कारवाई ! अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबधित 20 ठिकाणांवर छापेमारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NIA Raids In Mumbai | राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) डी-कंपनीवर (D-Company) मोठी कारवाई करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मुंबईतील (Mumbai) जवळपास 20 ठिकाणांवर छापेमारी (NIA Raids In Mumbai) केल्याची माहिती आहे. यात काही बांधकाम व्यावसायिकांचाही समावेश दाऊदचे शार्प शूटर्स, ड्रग्ज पेडलर्स यांच्याशी निगडीत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, दाऊदच्या हवाला ऑपरेटर्सवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दाऊदशी निगडीत मुंबईतील नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजार आणि इतर काही ठिकाणी छापेमारी (NIA Raid In Mumbai) करण्यात आली आहे. अनेक हवाला ऑपरेटर आणि ड्रग्ज पेडलर दाऊदशी संबंधित असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळाली होती. फेब्रुवारीमध्ये याबाबत नोंद घेण्यात आली होती. आजपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली, असे एनआयएने सांगितलं.

 

 

Web Title :- nia raids begin at several locations in mumbai on the premises of associates of underworld don dawood ibrahim

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा