Nihar Thackeray with Eknath Shinde | जो काही कायदेशीर पाठिंबा लागेल तो…, बाळासाहेब ठाकरेंचे मोठे नातू एकनाथ शिंदेंच्या पाठीशी, निवडणूक आयोगातही लढणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Nihar Thackeray with Eknath Shinde | धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) शिवसेनेचे (Shivsena) की शिंदे गटाचे (Shinde Group) यावर कार्यवाही करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निवडणूक आयोगाचा (Election Commission) मार्ग मोकळा केला आहे. प्रथम 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय व्हावा नंतर पक्षचिन्हावर, अशी शिवसेनेची मागणी होती. यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का बसला आहे. या सर्व घडमोडीत एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ती म्हणजे शिंदे गटाच्या वकिलांच्या पॅनलमध्ये बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नातू आणि दिवंगत बिंदू माधाव यांचे पूत्र निहार ठाकरे (Nihar Thackeray With Eknath Shinde) हे आहेत. सध्या याबाबत चर्चा सुरू आहे.

 

निहार ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयात वकील असून त्यांनी आजच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, एकनाथ शिंदेंना भेटलो तेव्हा त्यांना म्हणालो की ते बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चालले आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा आहे.

अ‍ॅड. निहार ठाकरे म्हणाले, शिंदेंच्या बाजुने आम्ही आमची बाजू मांडली.
न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कामकाजाला परवानगी दिली आहे. आयोगाकडील लढाई आम्ही नक्कीच जिंकू.
आमच्याकडे बहुमत आहे. जवळपास 80 टक्के आमदार, खासदार आणि पक्षाचे पदाधिकारी आमच्याकडे आहेत.
कोणाला मुदत द्यायची की नाही हे आता निवडणूक आयोग ठरवेल. त्यांना आणखी मुदत मिळेल असे वाटत नाही,
त्यांनी एवढ्यात सर्व दाखल करायला हवे होते. आम्ही दीड लाख अफिटेव्हिट आयोगाकडे दिली आहेत.

 

निहार ठाकरे पुढे म्हणाले, धनुष्यबाण कोणाला मिळेल यावर, ज्या गटाकडे मेजॉरिटी सपोर्ट असतो त्याच गटाचा पक्ष मानला जातो.
निवडणूक आयोगाची तारीख जाहीर होण्यासाठी लवकरच पत्र लिहिणार आहोत.
तसेच मी राजकारणात येण्याचा विचार केलेला नाही. शिंदेंना जो काही कायदेशीर पाठिंबा लागेल तो देणार.

 

Web Title :- Nihar Thackeray with Eknath Shinde | balasaheb thackerays great grandson nihar thackeray provided legal help to cm eknath shinde against uddhav thackeray shivsena who are they

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Akola ACB Trap | 4 हजार रुपयांची लाच घेताना महावितरणचा कार्यकारी अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Maharashtra Cabinet Decisions | पोलीस शिपायांची सर्व रिक्त पदे भरणार, मंत्रिमंडळ बठकीत महत्त्वाचे 14 निर्णय

Pankaja Munde | भगवान भक्तीगडावर दसर्‍याची जोरदार तयारी, पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन, म्हणाल्या – तयारीला लागा…