संजय राऊत ‘पेंग्विन’चा राहुल गांधी करणार : नीलेश राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी ट्विटरवरुन शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत सारखी लोकं पेंग्विनचा राहुल गांधी करतील, असे ट्विट करत त्यांनी शिवसेनेचे प्रवक्‍ते संजय राऊत व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा सध्या सुरु आहे.

बुधवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत म्हणाले होते की , राज्यातील जनतेला तरुण चेहऱ्याची आवश्यकता आहे. राज्यातील जनता आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारेल. आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी की नाही, याचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील.

‘महाराष्ट्र आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारेल’ ह्या बातमीची लिंक ट्विटरवर शेयर करत निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे की, ‘संजय राऊत यांच्यासारखी लोकं ‘पेंग्विन’चा राहुल गांधी करणार, देव करो असा काळा दिवस महाराष्ट्रावर कधी येऊ नये.’

काय म्हणाले होते संजय राऊत
आदित्य ठाकरेंनी तरुणांचे नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीविषयी तरुणांमध्ये एक जबरदस्त आकर्षण आहे. उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरेंसाठी लहान पद आहे. आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे नेतृत्त्व करतील अशा घडामोडी सुरू आहेत, असे मत संजय राऊत यांनी व्यक्‍त केले होते.

Loading...
You might also like