‘संजय राऊतांना ‘TV’ आणि उद्धव ठाकरेंना ‘Cadbury’ चॉकलेट द्या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप सगळ्यात मोठा पक्ष आणि शिवसेना दुसरा पक्ष ठरला आहे. दोन्ही पक्षांच्या युतीला जनतेने बहुमत दिले. दोन्ही पक्ष एकत्र सत्तास्थापन करणार असे वाटत असताना युतीमध्ये वाद सुरु झाले. मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु झाली. या सगळ्यात संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांसमोर शिवसेनेची ठाम भूमिका मांडली. त्यामुळे सोशल मीडियावार त्यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली. यामध्ये माजी खासदार निलेश राणे यांनीही संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती ‘प्रहार’ केला आहे.

माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरद्वारे घणाघाती टीका केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना टीव्ही आणि लाईट बिलाचे पैसे द्या, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कॅडबरी चॉकलेट द्या, अशा शब्दात ट्विट करत निलेश राणे यांनी टीका केली आहे. त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. आता यावर शिवसेकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यात येते हे पहावे लागेल.

‘संज्या राऊत इतका गरीब आहे की मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघायला पवार साहेबांच्या घरी गेला. बाकी राहुदे त्याला अगोदर कोणी तरी TV आणि लाईट बिलचे पैसे द्या. आणि उध्दव ला cadbury चॉकलेट द्या बिचाऱ्याला वाईट वाटलं की त्याला खोटारडा म्हटलं. शाळेत असल्यासारखा वाटलं त्याला बघून.’ अशा शब्दात त्यांनी ट्विट केले आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like