Nilu Kohli Husband Death | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींच्या पतीचे निधन; घरातील बाथरूममध्ये आढळला मृतदेह

पोलीसनामा ऑनलाईन टीम : प्रसिद्ध अभिनेत्री निलू कोहली (Nilu Kohli) यांचे पती हरमिंदर सिंग कोहली (Harminder Singh Kohli) यांचे काल मुंबईमध्ये निधन (Pass Away) झाले आहे. त्यांची प्रकृती चांगली होती. मात्र शुक्रवारी दुपारी गुरुद्वारातून घरी परतल्यानंतर ते बाथरूममध्ये गेले आणि तिथेच कोसळले. हि घटना घडली तेव्हा नीलू यांच्या घरातील हेल्पर तिथे होता. यानंतर हरमिंदर सिंह यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यागोदरच त्यांचा मृत्यू झाला होता.
नीलू कोहलीच्या मैत्रिणीने दिली माहिती
नीलू कोहली यांची मैत्रिण वंदना अरोरा (Vandana Arora) यांनी हरमिंदर सिंह यांच्या निधनाची बातमी दिली. शुक्रवारी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास हि घटना घडली आहे. हरमिंदर सिंग कोहली हे शुक्रवारी सकाळी गुरुद्वारात गेले होते. त्या ठिकाणाहून ते घरी परतले आणि बाथरूममध्ये गेले आणि त्या ठिकाणी ते कोसळले. हि घटना घडली तेव्हा त्यांच्या घरी फक्त एक मदतनीस होता. तो पण जेवणाची तयारी करत होता. बराच वेळ झाला हरमिंदर आले नाही त्यामुळे तो त्यांच्या रूममध्ये गेला पण तिकडे ते दिसले नाही. यानंतर त्याने बाथरूममध्ये पहिले असता हरमिंदर हे मृतावस्थेत पडले होते. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यागोदरच त्यांचा मृत्यू झाला होता.
नीलू कोहली आणि हरमिंदर यांचा मुलगा हिकडं नसल्याने तो आल्यावर रविवारी हरमिंदर सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. नीलू कोहली यांनी आतापर्यंत अनेक मालिका व चित्रपटांमध्ये सहायक भूमिका साकारल्या आहेत. नीलू कोहली यांनी हाउसफुल 2, पटियाला हाउस, हिंदी मीडियम यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नीलू कोहली यांची ‘यूनाइटेड कच्चे’ ही वेब सीरिज 31 मार्च रोजी झी-5 या ओटीटी प्लेटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या वेब सीरिजमध्ये अभिनेता सुनील ग्रोवर (Sunil Grover) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
Web Title :- Nilu Kohli Husband Death | actress nilu kohli husband harminder
singh kohli passed away
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
IPL 2023 | लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का! ‘हा’ मॅच विनर खेळाडू आयपीएलमधून होणार बाहेर?