Pune Crime News | गाडी लावण्याच्या वादातून तरुणाच्या डोक्यात वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; दुकानात शिरुन टोळक्याने केली तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सोसायटीच्या मेन गेटसमोर गाडी लावण्यावरुन झालेल्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. त्यानंतर दुकानात शिरुन सामानाची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी महंम्मद जुबेर मेहंदी हसन शेख Muhammad Zubair Mehndi Hasan Shaikh (वय २७, रा. कोंढवा) याने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७७/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शादाब शाहीद शेख Shadab Shaheed Sheikh (वय २६, रा. तांबोळी गल्ली, डायस प्लॉट, गुलटेकडी) याला अटक (Arrest) केली आहे. त्याच्या ६ साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार नाना पेठेतील एस एस कार डेकोर येथे २३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महंम्मद शेख हा एस एस कार डेकोर येथे कामगार आहे. त्यांच्या दुकानाच्या शेजारील रुबी मोटर्समध्ये शादाब शेख हा कामगार आहे. सोसायटीच्या मेन गेटसमोर गाडी लावण्याच्या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. तो राग मनात ठेवून शादाबच्या सांगण्यावरुन त्याचे ६ साथीदार तेथे आले. त्यांनी फिर्यादीच्या दुकानात येऊन कोयत्याने त्यांच्या डोक्यात वार केले. फिर्यादी यांनी वार हुकवून तो पळून जाऊन जवळच आडोशाल लपून बसला. तेव्हा या टोळक्याने दुकानात घुसून दुकानातील सामानाची तोडफोड करुन ४० हजार रुपयांचे नुकसान केले. दुकानाचे बाहेर येऊन हातातील हत्यार हवेत फिरवून तेथे थांबलेल्या लोकांवर उगारुन जोरजोरात आरडा ओरडा करुन दहशत निर्माण केली. सहायक पोलीस निरीक्षक माळी (Assistant Police Inspector Mali) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | An attempt to kill a young man by stabbing
him in the head over a parking dispute; The gang vandalized the shop

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IPL 2023 | लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का! ‘हा’ मॅच विनर खेळाडू आयपीएलमधून होणार बाहेर?

Pune-Satara National Highway | पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढून घ्या, अन्यथा…

Maharashtra Agriculture Minister Abdul Sattar | कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली श्रीरामपूर व राहाता तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी

7th Pay Commission |  केंद्रीय कर्मचारी-पेन्शनधारकांना खुषखबर, मोदी सरकारने वाढवला 4 टक्के DA

NHAI Appeal To Remove Encroachments On Pune-Satara National Highway | पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन