Nitin Gadkari | नितीन गडकरींनी ऐकवला भर सभेत शेर; ‘गधा’ नक्की कोणाला म्हणाले असा विरोधकांचा सवाल

पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे त्यांच्या खास भाषण शैलीसाठी नावाजले जातात. त्यांच्या भाषणामध्ये ते उपस्थितांना आपलेसे करत भाषण रंगवत असतात. त्यांचे विधानं हे नेहमी राजकीय वर्तुळामध्ये चर्चेची नवीन ठिणगी टाकत असतात. विरोधकांना देखील नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची गुगली अनेकदा लक्षात येत नाही. यावेळी देखील गडकरींनी राजस्थान मधील त्यांचे भाषण रंगवले असून त्या भाषणातील त्यांनी मारलेला शेर हा चर्चेचा विषय ठरत आहे.

राजस्थानमध्ये या वर्षाच्या शेवटी विधानसभेच्या निवडणूका (Rajasthan Assembly Elections) होणार आहेत. यासाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून भाजपाने (BJP) देखील कंबर कसली आहे. सध्या राजस्थानमध्ये काँग्रेसचे (Congress) सरकार असल्यामुळे भाजपा राजस्थान विधानसभा निवडणूकीसाठी जय्यत तयारी करत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ‘परिवर्तन यात्रा’ (BJP Parivartan Yatra) सुरु केली आहे. या यात्रेचा शुभारंभ काल (दि.05) राजस्थानच्या हनुमानगढ भागातल्या गोगामेडी येथून करण्यात आला. यावेळी भाजपातील इतर नेत्यांसह नितीन गडकरी यांनी कॉंग्रेसवर सडकून टीका केली आहे.

या दरम्यान मंत्री नितीन गडकरी यांनी भाषणामध्ये राहुल गांधींसोबतचा (Rahul Gandhi) किस्सा शेअर केला आहे.
ते म्हणाले की, “आज मी मंदिरात गेलो होतो. राहुलजी माझ्या बाजूला उभे होते.
तेव्हा मंदिरातले पुजारी व भक्तगण मला विचारत होते हे मंदिर कुणी बनवलं? मी विचारलं कुणी बनवलं?
तर ते म्हणाले वसुंधराजींनी बनवलं. मी म्हटलं वसुंधराजींनी आत्ता 100 कोटींचं बनवलं.
तुम्ही भाजपाला निवडून द्या, मंदिराच्या भवतालचं 500 कोटींचं काम होईल”, असा किस्सा त्यांनी भाषणादरम्यान शेअर केला आहे.

पुढे गडकरींनी भाषणामध्ये एक शेअर सुनावला आहे. या शेरमुळे सध्या राजकीय चर्चा रंगल्या असून हा शेर
खरंच विरोधकांसाठी होता की आणखी कोणासाठी असा प्रश्न कॉंग्रेस विचारत आहेत.
गडकरी म्हणाले की, “एक मोठे शायर एक शेर सांगायचे. मी चेष्टा करतोय, कुणाला बोलत नाही.
ते म्हणायचे, “इधर गधे, उधर गधे, सब तरफ गधेही गधे.. अच्छे घोडों को नहीं है घास, और गधे खा रहे च्यवनप्राश”.
समझनेवालों को इशारा काफी है” अशा शब्दांत नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी त्यांचा शेर भर सभेमध्ये ऐकवला.
मात्र यावरुन नितीन गडकरी ‘गधा’ नक्की कोणाला म्हणाले असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.
नितीन गडकरी यांनी हा शेर कॉंग्रेससाठी जरी वापरला असला तरी देखील विरोधकांकडून गडकरी यांचा रोख
मोदींकडे (Narendra Modi) असल्याचे बोलले जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation Protest | मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांचा विरोध; राज्य सरकारला दिला इशारा

MHADA Pune Lottery | म्हाडातर्फे 5 हजार 863 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात

Pune Dahi Handi – Traffic Updates | पुण्यात दहिहंडी उत्सावानिमित्त वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग