Lockdown बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं पुन्हा स्पष्टीकरण; म्हणाले – ‘सध्या निर्णय नाहीच’

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. पण रुग्णसंख्येचा आलेख वाढतच आहे. त्यानंतर आता पु्न्हा लॉकडाऊन लागू होणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनबाबत भाष्य केले.

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढणे ही चिंतेची बाब आहे. त्यानुसार आता लॉकडाऊनच्या चर्चा सुरु आहेत. राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘लॉकडाऊनमुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न उद्भवतो, याची जाणीव सरकारला आहे. या सर्वाचा विचार करूनच सर्व निर्णय घेतले जातात. त्यामुळेच लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय ठेवला आहे. पण परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर ते करावे लागू शकते. मात्र, सध्या राज्यात लॉकडाऊन लावण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण लॉकडाऊन लावण्याबाबत चर्चा सुरु आहेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, काही दिवस निर्बंध कडक केले जाणार आहेत. पण लॉकडाऊन लागणारच नाही असे नाही. परिस्थिती पाहून याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. लॉकडाऊन ही प्रक्रिया कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महत्त्वाची असते, असे राजेश टोपे म्हणाले.