‘या’ कारणामुळे गेल्या 3 महिन्यापासून तुमच्या अकाऊंटमध्ये आली नाही गॅसची ‘सबसिडी’, सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय, जाणून घ्या

नवी दिल्ली : मागील 3 महिन्यांपासून लोकांच्या बँक खात्यात गॅस सबसिडीचे पैसे येणे बंद झाले आहे. मे 2020 पासूनच घरगुती एलपीजी गॅसवर मिळणारी सबसिडी ग्राहकांच्या खात्यात येणे बंद झाले आहे. कारण सरकारने मे महिन्यापासूनच ग्राहकांना मिळणारी सबसिडी बंद केली आहे. परंतु, ही सबसिडी बंद करण्याचा निर्णय का घेण्यात आला, ते जाणून घेवूयात..

वाढले एलपीजी सिलिंडरचे दर
स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर मिळणार्‍या सबसिडीत मागील एक वर्षांपासून सतत कपात केली जात आहे. सबसिडीवाला सिलेंडर 100 रूपयांनी महागला आहे. यासोबतच मिळणारी सबसिडी शून्य झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीत मागच्या वर्षी जुलैमध्ये 14.2 किलोग्रॅमच्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत 637 रूपये होती, जी आता कमी होऊन 594 रुपये झाली आहे.

देशात मागील एक वर्षात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 100 रुपयांपर्यंतची वाढ नोंदली गेली. केंद्र सरकार एका वर्षात प्रत्येक घरासाठी 14.2 किलोग्रॅमचे 12 सिलेंडरवर सबसिडी देत होते. जर यापेक्षा जास्त सिलेंडर हवे असल्यास बाजार भावाने खरेदी करावे लागत होते.

मे, जून आणि जुलैचे आले नाहीत पैसे
केंद्र सरकारने मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलेंडरचा दर रिवाईज करताना ही गॅस सबसिडी बंद करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे मे, जून आणि जुलैमध्ये गॅस घेऊनही ग्राहकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आले नाहीत.

बाजार भाव झाला बरोबर
गॅस सिलेंडरचे बाजार मूल्य किंवा विना अनुदानित सिलेंडरची किंमत खुप कमी झाली आहे. यादरम्यान अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. यामुळे दोन्ही सिलेंडरमधील अंतर सरकारने जवळपास संपवले. हे कारण पुढे करत सरकारने आता घरगुती सिलेंडरवर सबसिडी देणे बंद केले आहे.