भारतीय ‘सिनेमे’ दाखवण्यास ‘बंदी’, ‘कुरापती’ ना’पाक’ सरकारचा निर्णय !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तान सरकारने निर्णय घेतला आहे की पाकिस्तानात भारतीय सिनेमे प्रदर्शित करण्यास आणि सिनेमा दाखवण्यास बंदी घातली आहे. पाकिस्तानी सिनेमागृहात आता भारतीय सिनेमे दाखवले जाणार नाहीत. पाकिस्तानचे सूचना प्रसारण मंत्री फिरदौस आशिक अवान यांनी सांगितले की पाकिस्तानच्या कोणत्याही सिनेमागृहात कोणतेही भारतीय सिनेमा दाखवले जाणार नाहीत.

जम्मू काश्मीरमधील ३७० कलम रद्द –
भारताने जम्मू काश्मीरमधील ३७० कलम आणि ३५ A कलम रद्द केल्यानंतर भेदरलेल्या पाकिस्तानने विविध कुरापती आणि निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकारने दोन्ही संसदेत हे विधेयक समंत करुन काश्मीरमधील हे कलम रद्द केले आहे. यानंतर आता जम्मू काश्मीर आणि लद्दाख हे एकत्रित राज्य राहिले नसून आता हे राज्य केंद्रशासित प्रदेश करण्यात आले आहेत.

भारत सरकारने जम्मू काश्मीरबाबत घेतलेल्या या निर्णयानंतर पाकिस्तान सरकारची भंबेरी उडाली आहे. पाकिस्तानमध्ये लोकांमध्ये देखील या निर्णयानंतर आक्रोश पहायला मिळत आहे. यानंतर पाकिस्तान भारतासंबंधित विविध निर्णय घेत आहे.

पाकिस्तानने हवाई क्षेत्रात देखील बदल केले आहेत. यामुळे पाकिस्तानमधून प्रवास करणाऱ्या विमानांवर बंधने आली आहेत. आता यानंतर कुरापती पाकिस्तानने पाकिस्तानात भारतीय सिनेमे दाखवण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता पाकिस्तानात कोणतेही भारतीय सिनेमे दाखवण्यात येणार नाहीत, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी या संबंधित माहिती दिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त