नोरा फतेहीनं पॅरीसमध्ये ‘कमरिया’ गाण्यावर केला ‘तुफान’ डान्स, वारंवार पाहिलं जातंय Song !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार नोरा फतेही नुकतीच पॅरीसच्या ऑलम्पिया स्टेजवर आली होती जिथं तिनं आपला धमाकेदार डान्स परफॉर्मं दिला. नोरानं तिच्या डान्सचं व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केलं आहे. सध्या नोराचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर आगीसारखा परसताना दिसत आहे. नोराला पाहण्यासाठी तिचे हाजारो चाहते आले होते ज्यांनी नोराच्या लाईव्ह डान्सचा आनंद घेतला.

नोरानं नुकताच तिच्या पॅरीसमधील डान्सचा व्हिडीओ सोशलवरून शेअर केला आहे. चाहत्यांनाही नोराचा हा डान्स प्रचंड आवडला आहे. चाहते वारंवार तिचा डान्स पाहताना दिसत आहेत. नोराचा हा व्हिडीओ एवढा व्हायरल झाला की, दोनच दिवसात या व्हिडीओला 8 लाख 99 हजार व्ह्युज मिळाले आहेत. नोराच्या अनेक चाहत्यांनी व्हिडीओ लाईक करत त्यावर कमेंटही केली आहे. कोणी तिच्या डान्सचं कौतुक केलं आहे तर कोणी तिच्या लुकचं कौतुक केलं आहे. सध्या आपल्या जोरदार डान्सनं तिनं चाहत्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर अलीकडेच स्ट्रीट डान्सर थ्री डी सिनेमात दिसली होती. नोरानं बॉलिवूडमध्ये अनेक आयटम नंबर केले आहेत. साकी साकी, दिलबर, एक तो कम जिंदगानी हे तिचे आयटम साँग खूपच गाजले आहेत.

 

You might also like