Nora Fatehi | काय सांगता ! होय, नोरा फतेही करतेय लग्न; सोशल मीडियावर होणाऱ्या नवऱ्याचा फोटो जोरदार व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या तिच्या हॉट फोटो (Nora Fatehi Hot Photos & Video) आणि व्हिडिओंमुळे कायम चर्चेत आहे. तिच्या सौंदर्याचे अनेकजण दीवाने असून तिने आपल्या अभिनय कौशल्यावर बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र अशातच नोरा (Nora Fatehi) विवाहबंधनात अडकणार आहे.

 

28 वर्षीय नोरा फतेहने स्वत: आपल्या होणाऱ्या नवऱ्याबाबत माहिती दिली आहे. नोराच्या नवऱ्याचा फोटो पाहण्यासाठी तिचे चाहते वेडे झाले आहेत. मात्र तुम्हाला फोटो पाहून आश्चर्य वाटेल की नोराचा होणारा नवरा हा तिच्यापेक्षा खूप लहान आहे. नोराने पोस्ट केलेला फोटो प्रत्येकाने पाहिला मात्र सर्वांचा एप्रिल फूल झालं आहे.

एका लहान मुलाने रील बनवत त्यामध्ये नोरासोबत आपल्याला लग्न करायचं आहे.
तो म्हणाला होता की, मला दिलबर दिलबर (Dilbar Song) वाल्या नोरा फतेहीशी लग्न करायचं आहे.
नोराने आपल्या चाहत्याचा रील पोस्ट केला होता आणि ती या लहान मुलाशी लग्न करणार असल्याचं तिने गमतीने म्हटलं होतं.

 

दरम्यान, मला माझा नवरा सापडला असून मी त्याच्याशी लग्न करणार असल्याचं नोराने म्हटलं होतं.
नोराची ही पोस्ट आणि चिमुकल्याचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

Web Title :- Nora Fatehi | nora fatehi going to tie the knot with special person she reviled about him and share video of her would be husband fact check


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा