सर्जरीसाठी 20 दिवस गायब झाले का किम जोंग उन ? आता दक्षिण कोरियानं केला ‘हा’ नवा दावा

नवी दिल्ली : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन शस्त्रक्रिया करून 20 दिवसानंतर सार्वजनिक ठिकाणी परत आला असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, आता तेथील स्थानिक न्यूज एजन्सीने दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती भवन ब्लू हाऊसच्य एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने या गोष्टीचे खंडन केले आहे.

‘किम जोंगची शस्त्रक्रिया संदर्भातील बातमी बरोबर नाही’

न्यूज एजन्सीने ब्ल्यू हाऊसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्यानुसार किम जोंगची शस्त्रक्रिया संदर्भातील बातमी योग्य नसल्याचे सांगितले. उत्तर कोरियाच्या हुकूमशहाबद्दल असा अंदाज बांधला जात होता की तो आजारी आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. किम जोंग जेव्हा देशातील महत्त्वाच्या राजकीय कार्यक्रमात सहभागी नव्हता, तेव्हा त्यांच्या प्रकृतीविषयी प्रश्न उपस्थित झाले होते. देशाचा संस्थापक आणि किम जोंग-उनचे आजोबा यांच्या वाढदिवशी 15 एप्रिल रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

दरम्यान, किम जोंग उनने सार्वजनिकपणे बाहेर पडत 1 मे रोजी खताच्या कारखान्याचे उद्घाटन केले. कोरियनच्या एका न्यूज एजन्सीने सांगितले की किमने रिबन कटिंग करून सोहळ्यात भाग घेतला.

हुकूमशहाबरोबर त्यांची बहीण किम यो जोंग आणि अन्य वरिष्ठ अधिकारी होते. जागतिक कामगार दिन, मे दिनानिमित्त सेंचॉन फॉस्फेटिक फर्टिलायझर फॅक्टरीचा हा सोहळा भव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला होता.

ट्रम्प यांनी किम जोंग यांच्या यशस्वी परतीबद्दल व्यक्त केला आनंद

त्याचवेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग-उनच्या यशस्वी परतीबद्दल आनंद व्यक्त केला. अध्यक्ष ट्रम्प यांनी उद्घाटनाचे फोटो ट्विटरवर शेअर करत म्हटले की, “मी एकासाठी (जोंग उन) आनंदी आहे. ‘बॅक अँड वेल’ पाहून आनंद झाला.” दरम्यान, अध्यक्ष ट्रम्प यांनी यापूर्वी किमच्या सार्वजनिक उपस्थितीवर भाष्य करण्यास नकार दिला होता. त्याला उत्तर म्हणून त्यांनी पत्रकारांना सांगितले होते की, योग्य वेळी त्या संदर्भात बोलण्यासाठी त्याच्याजवळ काही असेल.