… म्हणून निर्भयाच्या गुन्हेगारांना 1 फेब्रुवारीला देखील फाशी होणं कठीणच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया हत्याकांड आणि बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी पुढे ढकलण्यात आल्याने निर्भयाची आई अत्यंत निराश झाली आहे. त्या म्हणाल्या की मला न्याय हवा परंतु न्यायालय तो कसा देणार हे माहिती नाही. त्या म्हणाल्या की दोषींना जे हवे होते तेच होत आहेत. तारीखेवर तारखा देण्यात येत आहेत. आपली सिस्टम अशी आहे ज्यात दोषींचे ऐकले जाते.

1 फेब्रुवारीला देखील होणार नाही फाशी –
निर्भयांच्या आईचे वकील जितेंद्र झा म्हणाले की, मला वाटते की आता अजून 74-75 दिवस लागतील. न्यायाधीशांनी हे मान्य केले आहे की हा शिक्षा पुढे ढकल्याचा प्रकार आहे. नवे वॉरंट तर जारी करण्यात आले, परंतु जर दोषीने 31 जानेवारीला दुपारी 12 वाजेपूर्वी राष्ट्रपतींकडे दयेची याचिका दाखल केला तर फाशी पुन्हा रोखली जाईल.

दोषींच्या वकीलाने सांगितले की घटनेविरोधात डेथ वारंट जारी करण्यात आले आहे. न्यायाधीशांनी ज्युडिशअरी माइंड अ‍ॅल्पाय केले नाही. अजून कायदेशीर प्रक्रिया बाकी आहे. मी न्यायाधीशांना सांगितले की प्रकरण अडून आहे परंतु न्यायाधीशांनी ऐकले नाही. आम्ही आता उच्च न्यायालयात जाणार आहोत.

राष्ट्रपतींनी मुकेश सिंहची दया याचिका फेटाळली –
राष्ट्रपतींनी निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याची दया याचिका शुक्रवारी फेटाळली. मुकेश 2012 च्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपींपैकी एक आरोपी आहे.

हे प्रकरण डिसेंबर 2012 चे आहे, ज्या चालत्या बसमध्ये 23 वर्षीय पॅरामेडिकलच्या विद्यार्थीनीबरोबर सामूहिक बलात्कार केला गेला आणि हत्या करण्यात आली. या दोषींकडून तरुणींवर अत्याचार करुन जखमी अवस्थेत रस्त्यावर फेकण्यात आले. घटनेच्या काही दिवसानंतर निर्भयांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like