मुळशीतील कुख्यात गुंड पिस्तूलासह जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुळशी तालुक्यातील कुप्रसिद्ध टोळीशी संबंधित असलेल्या व मुळशीतील भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका कुख्यात गुंडाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून १ गावठी पिस्तूल व ५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

पप्पू उर्फ प्रकाश अरुण गायकवाड (रा. बहुली ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

तो मुळशीतील एका कुप्रसिद्ध गुन्हेगारी टोळीशी संबंधित असून त्याच्यावर पुणे शहर, पुणे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्याचा शोध घेतात तेव्हा तो भौगोलिक स्थितीचा फायदा घेऊन पोलिसांना गुंगारा देत होता. तसेच तो सतत पिस्तूल बाळगून असल्याने पोलिसांवरही हल्ला करण्याची शक्यता असायची. दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खून करून फरार झाला होता. त्याच्यावर शहरातील भारती विद्यापीठ, हिंजवडी, तर ग्रामीणमधील हवेली, पौड, राजगड या पोलीस ठाण्यांमध्ये ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच तो सासवड येथील एका गुन्ह्यातही फरार आहे.

पप्पू उर्फ प्रकाश अरुण गायकवाड हा मुठा गावाच्या एस. टी. स्टॅंड जवळ येणार असून त्याच्याकडे गावठी पिस्तूल आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

ही कारवाई पोलीस अधिक्षक संदिप पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक महेश मुंढे, सहायक फौजदार दत्तात्रय जगताप, कर्मचारी विजय कांचन, रौफ इनामदार, चंद्रशेखऱ मगर, धिरज जाधव, साईनाथ रोकडे, शाहू रोकडे, विशाल भोर, किशोर वाळुंजकर यांच्या पथकाने केली.

Loading...
You might also like