Coronavirus : रूग्णाचा आवाज सांगणार ‘कोरोना’ व्हायरसचा शरीरावर कितपत ‘इम्पॅक्ट’ !

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोना रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर अधारित व्हॉइस टेस्टींगची तपासणी सुरू करण्यात आली आहे. एक सप्टेंबरपासून सुरू केलेल्या तपासणी दरम्यान मुंबईत एक हजार कोरोना रूग्णांच्या व्हॉइस टेस्टींगची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

या प्रक्रियेअंतर्गत रूग्णाच्या आवाजावरून समजू शकते की, कोरोना संक्रमित झाल्यानंतर रूग्णाला किती रिस्क आहे आणि शरीरावर किती परिणाम होईल.

मुंबईतील पश्चिम उपनगरच्या नेस्को कोविड सेंटरमध्ये रूग्णांच्या आवाजाचे नमूणे घेतले जात आहेत. कोविड सेंटरच्या डीन डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले की, रूग्णांच्या आवाजाच्या नमूण्यांचा डाटा एकत्र केला जात आहे. येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत 2000 कोरोना रूग्णांच्या आवाजाचा डाटा एकत्र केला जाईल.

यानंतर आवाजाचे नमूणे इस्त्रायलच्या वेकेलिस हेल्थकेयर कंपनीकडे पाठवण्यात येतील, ज्यांचा रिपोर्ट सहा महिन्यात येईल. डॉ. अंद्राडे यांनी सांगितले की, कोविड सेंटरमध्ये येणार्‍या कोरोना पॉझिटिव्ह लोकांच्या व्हॉइस टेस्टींगची तपासणी केली जात आहे. हा एक रिसर्च असून यामध्ये रूग्णांची सर्व माहिती एकत्र केली जात आहे.

उदाहरणार्थ, कोरोना संक्रमितरूग्णाच्या आवाजात कोणते बदल झाले आणि आवाजात किती कंपन आहेत इत्यादीचे स्क्रीनिंगटूल बनवले जाईल. इस्त्रायलमध्ये व्हॉइस सॅम्पलला मॅच करून रिपोर्ट तयार केला जाईल. यानंतर समजेल की, कोरोनामुळे रूग्णाला किती रिस्क आहे आणि याचा शरीरावर काय परिणाम होईल. या मशीनने कोरोना रूग्णाची पहिल्या दिवशी, तिसर्‍या दिवशी आणि डिस्चार्जच्या दिवशी अशी तीनवेळा टेस्टींग होत आहे.

अमेरिका आणि इस्रायलमध्ये प्रयोग सुरू
कोरोना टेस्टींगसाठी या तंत्रज्ञानाचा प्रयोग अमेरिका आणि इस्त्रायलसारख्या देशात सुरू करण्यात आला आहे. कोरोनमध्ये रूग्णांच्या आवाजात अनेक बदल होत असतात.