‘PF’ची चोरी रोखण्यासाठी मोदी सरकारचा नवा ‘प्लॅन’, पैसे झाले अधिक ‘सुरक्षित’, एका ‘SMS’नं मिळणार संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी त्याचा प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PF फार महत्वाचा असतो. संपूर्ण आयुष्याची बचत यामध्ये सामावलेली असते. त्यामुळे तुमची कंपनी तुमच्या खात्यावर ती रक्कम जमा करत आहे कि नाही याची माहिती मिळवण्यासाठी सरकार नवीन उपाय आणत आहे. यासाठी EPFO ने नवीन सेंट्रलाइज्ड व्यवस्था तयार केली आहे. यामार्फत तुम्हाला तुमच्या खात्यात काही विशिष्ट रक्कम जमा होते कि नाही याची एसएमएसद्वारे माहिती मिळणार आहे.

कंपन्यांची तपासणी होऊ शकते –

जर कंपनीने तीन महिन्यांपर्यंत तुमच्या खात्यात PF जमा केला नाही तर तुम्हाला त्यांच्याविरोधात लिखित तक्रार करावी लागणार आहे. त्यानंतर कंपनीला PF बरोबरच त्यावरील तितक्या महिन्यांचे व्याज देखील कर्मचाऱ्याच्या खात्यावर जमा करावे लागणार आहे. त्यानंतर देखील कंपनीने पैसे जमा न केल्यास त्या कंपनीवर कारवाई करण्यात येईल.

निरीक्षकांना विशेष आदेश –

सरकारने हेदेखील स्पष्ट केले आहे कि, तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीत रक्कम जमा झाली नसेल तरच त्याचा तपास करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तपास अधिकाऱ्यांना देखील कोणताही पुरावा आणि योग्य माहिती असल्याशिवाय कोणत्याही कंपनीवर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.

कामात सुरळितपणा आणण्याकडे देखील लक्ष –

निरीक्षकांनी त्यांचे काम व्यवस्थित करण्यासाठी सरकारने हा नियम आणला आहे. अनेक वेळा कंपन्यांवर छापा टाकल्यानंतर त्यांच्याकडे कोणतीही चुकीची माहिती सापडत नाही, त्यामुळे उगाच कंपनीला त्रास दिला जातो. यामुळे सरकारने हि दक्षता घेतली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –