फायद्याची गोष्ट ! बचत खात्याच्या तुलनेत ‘दुप्पट’ फायदा आणि टॅक्समध्ये ‘सूट’ देखील, तात्काळ घ्या या सरकारी स्कीमचा ‘लाभ’
नवी दिल्ली : सर्वांची इच्छा असते की, लवकरात लवकर आपली गुंतवणूक डबल व्हावी, परंतु अनेकदा कुणालाच माहित नसते की, कसे आणि कुठे चांगले रिटर्न मिळतील. यावर एक्सपर्ट सांगतात की, जास्त रिटर्न नेहमी जोखिमीच्या ठिकाणी मिळतात. परंतु असे सर्वजण करू शकत नाहीत. आता प्रश्न असा निर्माण होतो की, अशी संधी सध्या कुठे आहे. कोणत्या सरकारी स्कीममध्ये सेव्हिंग अकाऊंटच्या तुलनेत डबल रिटर्न आणि टॅक्स बेनेफिट मिळत आहे…
ही स्कीम नॅशनल सेव्हिंगग सर्टिफिकेट (एनएससी) आहे. भारत सरकारकडून जारी एक छोटी बचत योजना आहे. ती पोस्ट ऑफिस चालवते. आता 1 एप्रिलपासून देशातील पोस्ट ऑफिस पेमेंट बँकमध्ये रूपांतरीत होतील, तेव्हा ही आणखी सुलभ होईल.
किती करू शकता गुंतवणूक
एनएससीशी संबंधीत एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही केवळ शंभर रूपये सुद्धा गुंतवू शकता. ज्याप्रकारे नोट 100, 500, 2000 च्या असतात, त्या प्रमाणे एनएससीची 100, 500, 1000, 5000 ची सर्टिफिकेट मिळतात. यामध्ये गुंतवणूक करण्याची कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कितीही रक्कमेचे एनएससी खरेदी करू शकता.
कोण करू शकतात गुंतवणूक
कुणीही व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करू शकतो. मुलांच्या नावावर सुद्धा हे खरेदी करू शकता. या सर्टिफिकेटचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा असतो. व्याज दरवर्षी जोडले जाते. कंपाऊंड इंटरेस्टच्या ताकदीवर हे पैसे सतत वाढत जातात. तुम्ही गुंतवलेले शंभर रूपये पाच वर्षानंतर 144 रूपये होतील. टॅक्सवर सूट केवळ 1.5 लाखापर्यंतच्या गुंतवणूकीवर आहे.
कुठून खरेदी कराल सर्टिफिकेट
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट एक मोठ्या कालावधीची गुंतवणूक आहे. याद्वारे एक निश्चित व्याजदरावर गुंतवणुकदाराला रिटर्न मिळते. भारत सरकारच्या पोस्ट ऑफिस योजनेंतर्गत हे जारी केले जातात. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये खरेदी करू शकता.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटची मॅच्युरिटी
याची मेच्युरिटी 5 वर्षांची आहे. काही अटी पूर्ण केल्या तर 1 वर्षाच्या मॅच्युरिटीनंतर खात्यातील रक्कम काढू शकता. यामध्ये व्याजदर दर 3 महिन्याला बदलला जातो किंवा निर्धारित केला जातो. यामुळे गुंतवणूकदाराला घटत्या-वाढत्या व्याजदरासह गुंतवणूकीच्या रक्कमेत सुद्धा बदल केला पाहिजे.
या योजनेचा लाभ 18 वर्षांच्या व्यक्तींना सुद्धा मिळू शकतो. म्हणजे या योजनेचा लाभ अल्पवयीनांना सुद्धा मिळतो. यासाठी त्यांच्या पालकांना आपल्या 18 वर्षांच्या मुलांच्या नावावर सर्टिफिकेट खरेदी करावे. यामध्ये दोन प्रौढ जॉईंट स्कीमद्वारे सुद्धा गुंतवणूक करू शकतात. तर एनआरआय आणि हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली या स्कीममध्ये सहभागी होऊ शकत नाही. हे एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करू शकता. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचे प्रमाणपत्र तुम्ही एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे हस्तांतरित करू शकात.
टॅक्स सूटसह मिळतील हे फायद
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला टॅक्स सेव्हिंगचा पर्याय मिळतो. आयकर कलम 80सी अंतर्गत टॅक्स सवलतीचा लाभ मिळतो. यामध्ये गुंतवणूक केल्याने टीडीएस कापला जात नाही. यामध्ये वेळेपूर्वी रक्कम काढू शकता. यासाठी पेनल्टी द्यावी लागते. एनएससीवर बँक आणि फायनान्शियल संस्थांकडून कर्ज घेता येते. याशिवाय यामध्ये चेकबुकची सुविधा सुद्धा मिळते.