गंभीरच्या गंभीर परिस्थितीत हरभजन आणि लक्ष्मण पाठीशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर आणि दिल्लीतील आपच्या उमेदवार आतिशी मार्लेना यांनी आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रकं वाट्ल्याचा आरोप केला आहे. त्यावरून दिल्लीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू हरभजन सिंह व व्ही. व्ही. एस. लक्ष्मण गौतम गंभीरच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत .

हरभजन सिंहने ट्विटमध्ये म्हंटल आहे की , ‘मी काल गौतम गंभीरशी संबंधित एक प्रकरण ऐकलं. ते ऐकून मला धक्काच बसला. मी त्याला खूप चांगलं ओळखतो. तो कधीही महिलांविरोधात चुकीचं बोलणार नाही. तो निवडणुकीत जिंको अथवा पराभूत होवो, माणूस म्हणून तो खूप चांगला आहे.’

तर व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे की , ‘मी गौतम गंभीरच्या प्रामाणिकपणाबद्दल मी खात्री देऊ शकतो. मी गौतमला दोन दशकांपासून ओळखतो. त्याच्या मनात महिलांबद्दल आदर आहे.’

 

काय आहे प्रकरण –

गौतम गंभीर निवडणूक जिंकण्यासाठी पत्रकं वाटत असल्याचा गंभीर आरोप आतिशी मार्लेना यांनी केला आहे. संबंधित पत्रकांमध्ये आप नेत्या आतिशी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या आईविरोधात अश्लील आणि अपमानास्पद भाषेचा वापर करण्यात आला आहे.

गौतम गंभीर यांनी आरोपांना उत्तर देताना आतिशी यांचे आरोप फेटाळले आहेत. तसेच जर आतिशी यांनी त्यांचे आरोप सिद्ध केले, तर मी माझी निवडणूक उमेदवारी मागे घेईन, असे म्हणत आतिशी यांच्यासह अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like