हरगुडेत रस्त्याच्या कारणावरून वृद्धास मारहाण ; एकास अटक

पुरंदर : पोलिसनामा ऑनलाईन – पुरंदर तालुक्यातील हरगुडे येथे रस्त्याच्या कारणावरून वृद्धास काठीने व दगडाने मारहाण करून जखमी केल्याने पाच जणांच्या विरोधात सासवड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची फिर्याद कल्याण निवृत्ती ताकवले यांनी सासवड पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. बाळकृष्ण रावसाहेब निगडे या एका आरोपीला अटक करण्यात पोलीसांना यश आले असून त्याला २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

सासवड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्यातील हरगुडे येथील रस्त्याच्या कारणावरून संदीप बाळकृष्ण निगडे , बाळकृष्ण रावसाहेब निगडे, रघुनाथ सुभेदार ताकवले, सुधीर रघुनाथ ताकवले, मधुकर गुलाब ताकवले ( सर्व रा. हरगुडे, ता. पुरंदर) या पाचजणांनी काठीने व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची फिर्याद कल्याण निवृत्ती ताकवले (वय- ६२, सध्या रा. हरगुडे ता.पुरंदर) यांनी दिल्याने सासवड पोलिसांनी पाच जनाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बाळकृष्ण रावसाहेब निगडे याला पोलिसांनी अटक केली असून २७ मार्चपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे.

या घटनेचा तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कुंडलिक माने करीत आहेत.