… तर फासावर लटकवले असते, साध्वी प्रज्ञांचे ओमर अब्दुलांना प्रत्युत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपकडून साध्वी प्रज्ञा ठाकूर भोपाळ येथून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुलल्ला यांनी टीका केली. निवडणूक लढण्यासाठी साध्वी प्रज्ञा यांची तब्येत बरी आहे का ? बरी असेल तर त्यांना पुन्हा तुरूंगामध्ये टाका असे ट्विट ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे. भाजपने साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी देऊन कायदा-सुव्यवस्थेचे धिंदवडे काढल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्यावर ट्रायल सुरू असून तब्येतीच्या कारणावरून जामिनावर बाहेर असल्याचे अब्दुल्ला यांनी पुढे नमूद केले.

अब्दुल्ला यांच्या टीकेला साध्वी प्रज्ञा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ओमर अब्दुल्ला यांच्यावर पलटवार करताना साध्वी प्रज्ञा म्हणाल्या, बरे झाले ओमर अब्दुल्ला साध्वीला फासावर लटकवले पाहिजे असे नाही म्हटले, कारण हेच त्यांचे कारस्थान होते. ओमर अब्दुला यांनी अधिक माहिती घ्यायला हवी की, मला तब्येतीच्या कारणामुळे जामीन मिळालेला नाही.

दरम्यान, बुधवारी साध्वी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर काही तासांतच त्यांना भाजपकडून भोपाळ मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. या मतदारसंघातून त्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना काँटे की टक्कर देणार आहेत.