Pune Crime | सातारा रोडवर PMPML प्रवासात 1 लाखांचे दागिने लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सातारा रोडवर (Pune-Satara Road) पीएमपी बसमधून (PMPML Bus) प्रवास करीत असताना एका महिलेच्या पर्समधील १ लाख रुपयांचे सोन्याचे गंठण चोरट्याने चोरुन नेले. (Pune Crime)

याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) एका महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी या सातारा रोडवरील राव नर्सिग होम ते बालाजीनगर येथील अहिल्यादेवी चौक दरम्यान पीएमपी बसमधून प्रवास करीत होत्या. प्रवासादरम्यान चोरट्यांनी गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांच्या खाद्यावरील पर्सची चैन अर्धवट उघडून पर्समध्ये ठेवलेले ५ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण चोरुन नेले.

सातारा रोड, नगर रोड, पुणे महापालिका (Pune Corporation) येथून पिंपरीकडे (Pimpri-Chinchwad) जाणार्‍या बस तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरुन (Collector Office, Pune) जाणार्‍या बसमधून प्रवास करणार्‍या महिलांना चोरट्यांची टोळी हेरुन त्यांच्याकडील पर्स तसेच अंगावरील दागिने चोरुन नेत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

Web Title :- Pune Crime | 1 lakh jewelery stolen PMPML Bus on Pune-Satara Road

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Omicron Covid Variant | तिसर्‍या डोससाठी बुक करावा लागणार नाही ‘स्लॉट’, असा घेऊ शकता डोस; मुलांबाबत व्हॅक्सीन कंपनीने दिला ‘हा’ इशारा

 

Pune Crime | खराडीत 2 कुटुंबात झाली हाणामारी, 7 जणांवर गुन्हा ! भांडणामागचे कारण ऐकून तुम्ही व्हाल हैराण

 

Police Inspector Transfer | पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील 11 पोलीस निरीक्षक, 2 सहायक पोलिस निरीक्षक, 9 उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

 

PPF Calculator | ‘या’ खास ट्रिकने पीपीएफमध्ये जमा करा पैसे ! व्हाल 1.5 कोटीचे मालक, जाणून घ्या कॅलक्युलेशन