Omicron Covid Variant | भारतात ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार झाल्याची शक्यता, ICMR ने व्यक्त केली भीती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Omicron Covid Variant | कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंट नंतर आता ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गाने सर्वत्र भीती पसरली आहे. सर्वात आधी  दक्षिण आफ्रिकेत हा विषाणू आढळला असून त्याचा संसर्गाचा वेग अधिक असल्याचे समोर आहे. अनेक देशांनी हटवलेले निर्बंध पुन्हा लागू केले आहेत भारतातही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या घडामोडींवर भाष्य करताना इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) साथीसंदर्भातील विभागाचे प्रमुख डॉ. समीरण पांडा (dr samiran panda icmr) म्हणाले की, देशात ओमायक्रॉन विषाणू (Omicron Covid Variant) आढळल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही कारण या विषाणूच्या अस्तित्वाचा शोध लागण्याआधीच त्याचा देशात प्रसार झाला असण्याची शक्यता आहे.

 

ओमायक्रॉन बाधित प्रत्येकी एक रुग्ण दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया या देशांमध्ये आढळला आहे. ९ नोव्हेंबरला आफ्रिकन देशांमध्ये या विषाणूचे पहिल्यांदा अस्तित्त्व आढळले. दक्षिण आफ्रिका असो कि अन्य देश काही महिन्यांमध्ये जगभर अनेक प्रवासी गेले आहेत. त्यातील काही जणांना या विषाणूची (Omicron Covid Variant) बाधा झाली असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे भारतातही हा विषाणू आढळून येऊ शकतो, असे पांडा म्हणाले.

 

नियमित आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुढे ढकलली

कोरोना संसर्गामुळे गेली २० महिने आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद होती. मात्र, ती सुरु करण्याआधीच ओमायक्रॉन विषाणूचे संकट ओढवले त्यामुळे १५ डिसेंबरला सुरु करण्यात येणारी हि सेवा आणखी पुढे ढकलण्याचा निर्णय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) घेतला आहे.

 

Web Title :- Omicron Covid Variant | coronavirus tension increase omecron possibility virus spreading india worrying information provided

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ajit Pawar | परराज्यातून येणाऱ्या लोकांसाठी RTPCR बंधनकारक; शाळांबाबतही अजित पवार म्हणाले…

Sangli News | सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका ! शेती, द्राक्षांच्या बागा पाण्यात, शेतकरी चिंतेत

Indrani Balan Foundation | ‘आयसर’मध्ये इंद्राणी बालन सायन्स ॲक्टिविटी सेंटरच्या उभारणीसाठी इंद्राणी बालन फाउंडेशनकडून 23 कोटी रुपयांची देणगी

Pune Crime | कोंढव्यातील मंगेश माने टोळीवर ‘मोक्का’ ! पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 62 वी MCOCA कारवाई

Gold Silver Price Today | महिन्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचा भाव

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार, नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST