Omicron Covid Variant | 5 वर्षांपेक्षा लहान मुलांना टार्गेट करतोय ‘ओमिक्रॉन व्हेरिएंट’; डॉक्‍टरांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Omicron Covid Variant | दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Covid Variant) जगाला धास्ती लागली आहे. अशातच भारतातही ओमिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केल्याने भारताची चिंता वाढली आहे. यातच या ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत आणखी एक भीतीदायक बाब समोर आलीय. 5 वर्षांखालील मुलांमध्येही या विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. असं दक्षिण आफ्रिकेतील डॉक्‍टरांचं म्हणणं आहे. यामुळे आता वेगळीच चिंता लागली आहे.

 

कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Covid Variant) जगाला चिंतेत ठेवलं आहे. अशातच या विषाणूचा संसर्ग लहान मुलांमध्ये वाढत असल्याचं सांगण्यात येत आहे. जरी सर्व मुलांना ओमिक्रॉन या विषाणूची लागण झाली नसली तरी मुलांमध्ये संसर्ग वाढल्याने चिंता वाढलेली आहे. सध्या आफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Covid Variant) हा विषाणू झपाट्याने पसरत आहे. यामुळे सर्व देशांना यांची धास्ती लागलेली आहे. अशातच ओमिक्रॉन हा 5 वर्षांपेक्षा लहान मुलांना टार्गेट करतोय असं आफ्रिकेतील एका डाॅक्टरने म्हटलं आहे.

मुलांना कोणत्याही विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका कमी असतो. पूर्वीच्या साथीच्या रोगांमध्येही असेच दिसून आलेय. परंतु तिसऱ्या लाटेत 5 वर्षांखालील मुले आणि 15 ते 19 वर्षे वयोगटातील तरुणांची हॉस्पिटलायझेशनची संख्या वाढली होती आणि आता चौथ्या लाटेत सर्व वयोगटांमध्ये, खरंतर 5 वर्षांखालील मुलांमध्ये संसर्ग वाढण्याचा ट्रेंड दिसून आला आहे. असं आफ्रिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस (NICD) च्या डॉ. वासिला जसैत (Dr. Waasila Jassat) यांनी म्हटलं आहे.

 

अपेक्षेप्रमाणे मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण अजूनही कमी आहे. परंतु 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये ते अधिक वेगाने वाढत आहे. 60 वर्षांवरील वृद्धांना या विषाणूची सर्वाधिक लागण होते आणि दुसऱ्या क्रमांकावर 5 वर्षांपेक्षा लहान मुलांची संख्या आहे. यावेळी काही वेगळे ट्रेंडही पाहायला मिळत असल्याचं देखील डॉ. जसैत (Dr. Waasila Jassat) यांनी सांगितलं आहे.

 

दरम्यान, लहान मुलांमध्ये संसर्ग झपाट्याने का पसरत आहे, यावर संशोधन करण्यात येणार आहे.
याविषयी काहीही बोलणे घाईचे आहे.
तसेच, सरकारने मुलांसाठी खाटा आणि कर्मचारी वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्‍यक असल्याचं एनआयसीडीशी संबंधित डॉ. मिशेल ग्रूम (Dr. Michelle Groome) यांनी म्हटलं आहे.
तसेच, तरुणांमध्ये तसेच गर्भवती महिलांमध्ये संसर्ग वेगाने पसरत आहे.
आशा आहे की, येत्या काही आठवड्यांत, या वयोगटात संसर्ग झपाट्याने का पसरत आहे याचे कारण आम्हाला कळेल,
अशी चिंता डॉ. साकिसी मालुलेके (Dr. Sakisi Maluleke) यांनीही व्यक्त केली आहे.

 

Web Title :- Omicron Covid Variant | Omicron Covid Variant targeting children under the age of five doctor said

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

खुलेआम सुरू आहे बनावट Aadhaar Card बनवण्याच धंदा, 10 मिनिटात तयार करतात कॉपी; असे ओळखा बनावट आणि खरे

Multibagger Stock | ‘या’ 5 शेयरने गुंतवणुकदारांना बनवले लखपती, 5 वर्षात दिला 200% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का हे stocks?

Gulam Nabi Azad | अमरिंदर सिंग यांच्यानंतर गुलाम नबी ‘आझाद’ होण्याची शक्यता, काँग्रेसचा ‘हात’ सोडून नवा पक्ष स्थापन करणार?