Omicron Infection-Immunity | ओमिक्रॉनच्या संसर्गापासून करायचा असेल बचाव तर आजच आपल्या आहारामध्ये समावेश करा ‘हे’ 5 फूड्स, जाणून घ्या कसा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Omicron Infection-Immunity | थंडीत शरीराची इम्युनिटी कमी होते. अशा स्थितीत कोणताही व्हायरस शरीरावर लवकर हल्ला करू शकतो. कोरोनाचा काळ अजून संपलेला नाही. आता कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे. (Omicron Infection-Immunity)

 

जगभरात कोरोना व्हायरसचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही आहे. कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या दिवसांपासून आपण सर्वांनी सतत ऐकलेला शब्द म्हणजे इम्युनिटी. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, इम्युनिटी कमी असल्याने संसर्ग होण्याचा धोका (Omicron Infection Rate) वाढू शकतो. अशा स्थितीत, इम्यूनिटी मजबूत ठेवणे खूप महत्वाचे आहे (How to boost immunity against Omicron). यासाठी अशा पदार्थांचे सेवन करा जे इम्युनिटी मजबूत (immunity booster food) करू शकतात. हिवाळ्यात या 5 गोष्टींचे सेवन अवश्य करा.

1. मनुका (Raisins) :
अ‍ॅन्टी-ऑक्सिडंटने समृद्ध मनुका शरीराला संसर्गापासून दूर ठेवण्यास मदत करतो. तसेच, मनुकामध्ये व्हिटॅमिन सी आणि बी भरपूर प्रमाणात असते.

 

2. बदाम (Almond) :
बदामाच्या सेवनाने केवळ इम्युनिटीच नव्हे तर तर हाडे सुद्धा मजबूत होतात. बदामामध्ये व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात असते, जे रोगांशी लढण्यासाठी उपयुक्त भूमिका बजावते. ते व्हायरस आणि बॅक्टेरियाचा प्रभाव कमी करते. (Omicron Infection-Immunity)

 

3. पिस्ता (Pistachio) :
पिस्तामध्ये अँटी-ऑक्सिडंट्ससोबतच कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम, बीटा कॅरोटीन आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन आढळतात. यामुळे इम्युनिटी वाढवण्यासोबतच हाडे मजबूत राहतात.

 

4. हळद (Turmeric) :
हळदीचा वापर हजारो वर्षांपासून औषधी, अँटिऑक्सिडंट आणि अँटी इम्फ्लेमटरी गुणधर्मांसाठी केला जात आहे. हळदीमध्ये कर्क्यूमिन हा मुख्य घटक आहे, जो आरोग्य फायदे देतो. यामुळे इम्युनिटी मजबूत होते. (Omicron Infection-Immunity)

 

5. रताळे (Sweet Potato) :
थंडीच्या हंगामात रताळी मुबलक प्रमाणात मिळतात. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन-ए (Vitamin A), पोटॅशियम आणि इतर अनेक पोषक घटक आढळतात. त्यामु इम्युनिटी मजबूत होते. याशिवाय रताळे हा व्हिटॅमिन-सी (Immunity Booster) आणि बीटा-कॅरोटीनचा चांगला स्रोत आहे.

 

या ऋतूत पौष्टिक अन्न खाल्ल्याने हंगामी आजारांचा धोका कमी होतो, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. अशा परिस्थितीत हिवाळ्यात ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने इम्युनिटी मजबूत होते. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, मास्कशिवाय घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टंसिंगचे पालन करा. तुमच्या हातांच्या स्वच्छतेची काळजी घ्या आणि कोविडचे लसीकरण पूर्ण करा.

 

Web Title :- Omicron Infection-Immunity | omicron infection boost your immunity include these 5 foods in your diet today know how

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Employees Pension Scheme बाबत मोठे अपडेट ! 9 पट वाढू शकते किमान पेन्शन, खात्यात दर महिना येतील इतके रुपये

Corona in Mumbai | मुंबईतील नवी रुग्णसंख्या 20 हजारांच्या वर! मुंबईत आता लॉकडाऊन लागणार?

Pune Crime | आर्मीमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणूक, ‘पिंपरी’ पोलिसांकडून सैन्यातून निवृत्त झालेल्या दोघांसह एजंट गजाआड