२२ लाखाची लाच स्विकारताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाईन शॉप मालकाकडून २२ लाखाची लाच घेताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. अंधेरी एमआयडीसी येथील गुन्हे प्रकटीकरण शाखा क्रमांक १० चे  पोलीस निरीक्षक आनंद सिताराम भोईर (वय-४३) यांना एसीबीकडून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

स्थानिक पोलीस ठाण्यात कलम ६५, ४१, ४३, ९०, १०८ महाराष्ट्र कायद्यान्वये २०१८ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक आनंद भोईर कामकाज पाहत होते. तपासादरम्यान वाईन शॉप मालकाविरोधात दाखल गुन्ह्यात अटकेची कारवाई न करण्यासाठी २५ लाखाची मागणी भोईरने केली होती. तडजोडीअंती लाचेची रक्कम २२ लाख इतकी ठरली.

त्यानंतर वाईन शॉप मालकाने एसीबीला याबाबत माहिती दिली. एसीबीने प्रकरणाची शहनिशा करून आज सापळा रचला. सापळ्यादरम्यान खाजगी वाहनात चालकासह भोईरला २२ लाख रुपये स्विकारताना रंगेहाथ पोलिसांनी अटक केली आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like