धुळे : मोहाडी उपनगरातून धारदार शस्त्रांसह एकाला अटक

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – मोहाडी उपनगरातील वनश्री कॉलनीतून एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडुन धारदार शस्त्रांसह सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

सविस्तर माहिती की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शहरातील मोहाडी उपनगरात मोहाडी पोलीसांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे एक पोलीस पथक तयार करण्यात आले. मोहाडी उपनगरातील वनश्री कॉलनीतील रहिवासी मिलनसिंग रामसिंग भादा याचे घरात चोरीचा माल लपविला असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पोलीस पथकाने घरावर छापा मारत घरातील साहित्यांची झाडाझडती घेतली. यात 3 तलवारी, 4 काटवणी, कुकरी, सुरे, चारचाकी, दुचाकी असा एकुण 1 लाख 81 हजार 175 रुपयांचा मुद्देमालासह एका संशयितास पोलीसांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पो.कॉ.कांतिलाल भगवान शिरसाठ यांनी फिर्याद नोंद केली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधिकारी डॉ.राजू भुजबळ, उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.सतिष गोराडे, स.पो.नि.विलास ठाकरे, पो.उप.नि.एम आय मिर्झा, पो.कॉ.प्रभाकर ब्राम्हणे, पो.कॉ.शाम निकम, पो.ना अविनाश गहिवड, पो.कॉ.जितेंद्र वाघ, पो.कॉ.सचिन वाघ, पो.कॉ.दिपक महाले, पो.कॉ.गणेश भामरे, मोनिका पाटील यांनी केली.

Visit : policenama.com