बोर विहीर पाझर तलावात पोहायला गेलेल्या तरुणाचा मृत्यु

धुळे  : पोलीसनामा ऑनलाइन – तालुक्यातील बोरविहिर गावातील पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेला तरुण पाण्यातील गाळ, गवतात अडकुन मयत झाला आहे.

सविस्तर माहिती की, तालुक्यातील बोरविहिर गावातील तरुण नंदु सोनार हा नेहमीच गावाजवळील पाझर तलावात पोहण्यासाठी जात असे काल सुध्दा तो नेहमी प्रमाणे सकाळी पाझर तलावात पोहायला गेला. परंतु दुपार झाली परत आला नाही. दुपारी गावात घरच्या मंडळींनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो सापडला नाही. गावातील काही तरुणांनी त्याला तलावाकडे जाताना पाहिले होते. लगेचच सगळ्यांनी तलावा कडे धाव घेत पाझर तलावातील पाण्यात गावकरी मदतीच्या शोध घेतला. पाझर तलावातील खोली जास्त असल्याने त्यात गाळ, गवत यामुळे तो पाण्यातील गाळात अडकला.

गावातील नागरीक, पोलीस पाटील, तालुका पोलीस, शोध पथकांची मदत घेण्यात आली. परंतू शोध घेऊन आढळुन आला नाही. आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमार पाझर तलावात काही अंतर दुरवर पाण्यात तरुणाचा मृतदेह तरंगताना ग्रामस्थांना आढळला. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्यात बाहेर काढुन नातवाईक व पोलीसांच्या मदतीने शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आला.
हि माहिती गावात कळताच सर्वञ हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तालुका पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक कैलास चौधरी करत आहे.

Visit : policenama.com