धुळे : शुल्लक वादातून एकाचा खून ; चौघांना अटक

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – रात्रीची वेळी असून आरडा-ओरड करू नका असे सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून एकाचा खून केल्याची घटना साक्री तालुक्यातील सुरपान गावात घडली. ही घटना बुधवारी (दि.१९) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. रतिलाल विश्राम सोनवणे (वय-५२) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून या घटनेत त्यांच्या मुलाला देखील बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी विशाल सोनवणे यांनी साक्री पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मयत रतिलाल सोनवणे हे बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घरासमोरील अंगणात झोपले होते. त्यावेळी भाऊसाहेब भटू देवरे आणि मयत रतिलाल यांचा भाऊ विश्राम सोनवणे हे दारू पिऊन जोरजोरात आरडा-ओरड करत होते. त्यावेळी रतिलाल यांनी मी दिवसभर शेतामध्ये काम करुन थकून आलो आहे. या ठिकाणी आरडा-ओरड करु नका. मला झोपू द्या असे सांगितले. त्यामुळे संतापलेल्या भाऊसाहेब देवरे याने त्याचे नातेवाईक संदीप शिवाजी देवरे, विशाल शिवाजी देवरे, किरण दादाजी देवरे यांना बोलावून आणत शिवीगाळ करून हाताबूक्यांनी रतिलाल यांना बेदम मारहाण केली.

चारजणांनी केलेल्या मारहाणीत रतिलाल हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती साक्री पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. दरम्यान, पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन चार जणांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे गावामध्ये खळबळ उडाली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश देवरे करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा