त्यांचा सौदा होण्या आधीच बहीण भावाने काढला पळ

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – एका महिलेने आंध्र प्रदेशातील एका बहीण-भावाला हॉस्टेलमध्ये ठेवते अशी बतावणी त्यांच्या आईला करत लातूरला आणले असून त्यांचा लाखात सौदा केला. यासंदर्भात मुलांना माहिती समाजतंचक त्यांनी परत घरी सोडण्याची विनंती केली असता त्यांना मारहाण करत चटके देण्यात आले. त्यावेळी प्रसंगअवधान साधत त्याहून पळ काढला असून तेथील जिल्हा रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

आंध्र प्रदेशातील कडाप्पा येथील राहवासी १० वर्षांचा विकास आणि ८ वर्षाची नेहा (नाव बदललेले) हे दोघे बहिण भाऊ. त्यांना वडील नसून ते आई सोबत राहत आहेत. दरम्यान त्यांच्या आईच्या ओळखीच्याच एका महिलेने पंधरा दिवसांपूर्वी ना हॉस्टेलमध्ये ठेवते, असे सांगत लातूर जिल्ह्यातील चाकूरला आणले. येथे दहा दिवस त्यांच्याकडून काम करून घेतले. त्याचा सौदा करण्यात येणार होता. त्या दोघांना यासंदर्भात चाहूल लागली असता त्यांनी परत आईकडे जायचे असा हट्ट धरला. त्यावेळी त्यांना स्पष्ट नकार देण्यात आला. इतकेच नव्हे तर, हे दोघे पळून जाण्याची तयारी करत असल्याचे त्या महिलेले कळले त्यावेळी त्या महिलेने दोघांनाही बेदम मारहाण केली. यावरच ती महिला न थांबता तिने त्यांना चटके देत गंभीर जखमी केले.

दरम्यान आपली सुटका होणार असे त्या दोघांना समजले असता, त्यांनी मध्य रात्री त्यांच्या तावडीतून पळ काढत रेल्वे स्थानक गाठले. आणि त्यांनी रेल्वेद्वारे परळीला आले. दरम्यान रेल्वे पोलिसांना ही माहिती समजली. पोलिसांनी बालहक्क कार्यकर्ता तत्वशील कांबळे यांना माहिती देत दोघांना बीडला आणले. सध्या त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर आहे. दोन्ही मुलांना जबर मारहाण झालेली आहे. हा प्रकार संशयास्पद असल्याने आम्ही गुन्हा दाखल करणार असल्याचे बालहक्क कार्यकर्ता तत्वशील कांबळे यांनी सांगितले.या दोन्ही मुलांना गेवराई तालुक्यातील सहारा अनाथालयात दाखल करण्यात आले आहे. याचबरोबर संतोष व प्रीती गर्जे यांनी त्यांचा दोन दिवस सांभाळ केला.

इतकेच नव्हे तर, नेहा आणि विकास यांना तेलगूशिवाय एकही भाषा येत नाही. त्यामुळे तेलगू भाषा समजणारी व्यक्ती बोलवून त्यांची समस्या जाणून घेतली. यावेळी त्यांनी आपला एक लाख रूपयांत सौदा झाला होता, आणि आपल्याला विक्री केली जाणार होते, असे सांगितले. आम्हाला आमच्या आईकडे जायचे आहे, असे म्हणत त्यांनी एकच हट्ट धरला आहे.

विशेष म्हणजे ज्या महिलेने या दोन मुलांना आणले होते, तिच्या पतीने चाकुर पोलीस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार दिली आहे. मात्र फिर्यादीत दाखल नावे आणि या मुलांचे आधार कार्डवरील नावे यात फरक आहे. त्यामुळे हा प्रकार खोटा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. बीडच्या शासकीय रूग्णालयात याची नोंद झाली असून शनिवारी चाकूर पोलीस जबाब घेण्यासाठी येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.