पुण्यात दशक्रिया विधीच्या भोजनाच्या कार्यक्रमात मधमाशांचा हल्‍ला ; एकाचा मृत्यू तर ६ जण जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दशक्रिया विधीनिमित्त जेवणाचा कार्यक्रम सुरु असताना अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने यात एका वृद्धाचा मृत्यू झाला तर ६ जण जखमी झाले आहेत. ही घटना वानवडीतील गवळी धाडगेनगर येथील वृंदावन इमारतीमध्ये शुक्रवारी घडली.

दत्ताराम देवराम गवळी (वय ७६ ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

शुक्रवारी वानवडीतील गवळी धाडगेनगर येथे गवळी यांच्या इमारतीमध्ये दशक्रिया विधीनिमित्त जेवणाचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी अचानक मधमाशांनी तेथील लोकांवर हल्ला केला. या हल्ल्यातून वाचण्यासाठी अनेकजण जीव मुठीत घेऊन पळू लागले. तर गवळी यांना मधमाश्यांनी चेहऱ्यावर चावा घेतला. तर नाका-तोंडात मधमाशा घुसल्या. त्यानंतर गवळी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांना रुग्णालयात दाखल होण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यांच्या मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवालानंतर समोर येईल असे सांगण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like