काकूवर जडलं पुतण्याचं ‘प्रेम’, घातले काकावर कुर्‍हाडीनं ‘घाव’

येवला : पोलीसनामा ऑनलाइन – येवल्याच्या खामगावमध्ये काकू-पुतण्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली असून, सख्ख्या पुतण्याने आपल्या काकाचा निर्घृणपणे खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. काकूवर असणाऱ्या एकतर्फी प्रेमातून पुतण्याने हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

ही धक्कादायक घटना येवला तालुक्यातील खामगाव येथे घडली आहे. मुकेश शेळके असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आज सकाळी मुकेश याने आपल्या काकाची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. जमिनीच्या वादातून मुकेशने आपल्या काकाची हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता.

मात्र,पोलीस चौकशीत मुकेशने दिलेल्या माहितीमुळे पोलिसही चक्रावले, मुकेशचे आपल्या काकूवर एकतर्फी प्रेम होते. काकूवर एकतर्फी प्रेम करत असताना काका त्यात अडथळा ठरत होता. त्यामुळे मुकेशने आपल्याच सख्ख्या काकाचा काटा काढण्याचं ठरवलं. आज सकाळी मुकेशने आपल्या काकाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली.

पोलिसांनी मुकेशला या प्रकरणी अटक केली असून, त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास येवला पोलीस करत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like