वर्धा : एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, प्रचंड खळबळ

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – एका कॉलेजमध्ये शिकवणार्‍या 24 वर्षांच्या तरूणीला एका 27 वर्षांच्या विवाहित इसमाने लग्नाला नकार दिल्याने जिवंत जाळले. ही थरारक घटना महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यात घडली.

ही घटना वर्ध्यातील हिंगणघाटच्या नांदोरी चौकात सोमवारी सकाळी 7 वाजाता घडली. पेट्रोलने जाळण्यात आल्याने पीडितेची प्रकृती अतिशय गंभीर आहे. उपचारासाठी प्रथम तिला उप-जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले, नंतर नागपुर येथील ऑरेंज सिटी रूग्णालयात दिला दाखल करण्यात आले आहे.

या घटनेबाबत माहिती देताना हिंगणघाटच्या पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, पीडितेचे वय 24 असून ती एका वुमन्स कॉलेजमध्ये मागील 7 महिन्यांपासून शिकवण्याचे काम करत होती.

पीडितेला त्या इसमाने अनेकदा प्रेमाची विचारणा केली, परंतु तिने प्रत्येक वेळी नकार दिला होता. यामुळे रागाच्या भरात तरूणाने पीडितेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळले.

घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवून आरोपीला अटक केली आहे. आरोपी पीडितेवर एकतर्फी प्रेम करत होता. आरोपी स्वत: विवाहित आहे. त्याची पीडितेशी ओळख होती. पीडित तरूणीचा विवाह अन्य कुणाशी तरी ठरल्याने तो नाराज होता. यामुळे त्याने पीडितेला जिवंत जाळण्याचे अमानुष पाऊल उचलले.