जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा चकमक, एका दहशतवाद्याचा ‘खात्मा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पाकिस्तानी सैन्याकडून सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच असल्यामुळे जम्मू काश्मिरमध्ये पुन्हा चकमक उडाली आहे. त्यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा भागातील त्रालमधील सिमोह परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. याअगोदर पाकिस्तानी सैन्याने शनिवारी सकाळापासून रविवार सकाळ पर्यंत सीमेवरील चौक्यांसह रहिवासी भागांना लक्ष करत गोळीबार केला होता.

कीरनी पासून बालाकोटपर्यंत शंभर किलोमीटर पेक्षा जास्त लांब नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून कुरपाती करणे सुरूच आहे. पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात मेंढर सेक्टरमध्ये काही जनावरेही जखमी झाले असून घरांचेही नुकसान झाले आहे. दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याकडूनही सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात येणार्‍या गोळीबारास भारतीय जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले. ज्यामध्ये सहा पाकिस्तानी सैनिक गंभीर जखमी झाले, शिवाय त्यांच्या काही चौक्या देखील उद्धवस्त झाल्या आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like