‘या’ गावात पाण्याच्या टाकीवर होतो Online Class, कारण ऐकून आश्चर्य वाटेल

गुजरात : वृत्तसंस्था – कोरोनामुळे शाळा बंद झाली तेव्हा विद्यार्थी अभ्यासापासून दूर असल्याचे पाहून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लास सुरु करण्यात आले. मात्र ऑनलाइन शिक्षणाची सर्वात मोठी समस्या नेटवर्क ही आहे, ज्यामुळे बरीच गावे अद्यापही ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत. नेटवर्कशिवाय ऑनलाइन वर्ग शक्य नाही. अशा परिस्थितीत एका गावात मुलं आपला जीव धोक्यात घालून नेटवर्क मिळवण्यासाठी 50 फूट उंच टाकीवर चढतात. तरी देखील ते ऑनलाईन वर्गात कसे तरी सहभागी होऊ शकतात.

हे दृश्य गुजरातच्या नाडियाद जिल्ह्यातील मटार तहसीलमधील ट्राणजा गावात दररोज पाहायला मिळते. येथे एक शासकीय शाळेचा शिक्षक येतो, परंतु मोबाइलमध्ये नेटवर्क नसल्याने मुलांना इतर विषय शिकण्यास मिळत नाहीत. अशावेळी ते मुलांना पाण्याच्या टाकीवर आणतात आणि मग काही वेळ मुले टाकीवर फिरून नेटवर्कची वाट पाहतात.

अशावेळी थोडाफार अभ्यास होतो अथवा तोही होत नाही. मुलांसमोर नेटवर्क अडथळा ही मोठी समस्या आहे, परंतु या मुलांनी यावर उपाय शोधला आहे आणि ते दररोज चांगल्या नेटवर्कसाठी या उंच टाकीवर चढत आहेत.

नेटवर्क समस्येमुळे, 80 टक्के मुलांनी ऑनलाइन शिक्षण सोडले
ट्राणजा गावच्या सरपंच चंद्रनिका बहन यांनी सांगितले की, या समस्येसाठी ग्रामपंचायतीने गेल्या 27 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांकडे लेखी अर्ज केला होता, यापूर्वी मी कितीवेळा खासदाराला विनंती केली होती पण परिस्थिती आहे तशीच आहे.

ट्राणजा आणि माछीयेल गावांची एकूण लोकसंख्या साडेतीन हजारांच्या जवळपास आहे आणि आता इथल्या जवळपास 80 टक्के मुलांनी ऑनलाइन अभ्यास सोडून दिला आहे.अशी परिस्थिती असूनही अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही.