Opposition Parties Meeting | विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं ! 2024 ला देशात INDIA विरुद्ध NDA सामना!; फुल फॉर्म काय?

सब हेडिंग - विरोधकांच्या INDIA ची पुढची बैठक मुंबईत, मल्लिकार्जुन खरगेंची घोषणा

बंगळुरू : वृत्तसंस्था – Opposition Parties Meeting | बंगळुरूमध्ये (Bangalore) विरोधी पक्षांच्या दोन दिवसांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून आज बैठकीचा पहिला दिवस होता. या बैठकीमध्ये देशातील 26 भाजप (BJP) विरोधी पक्षांनी हजेरी लावली होती. बैठकीत आघाडीच्या (Opposition Parties Meeting) नावासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला. विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीचं नाव INDIA ठेवलं आहे. या नावाचा फुल फॉर्म (Indian National Democratic Inclusive Alliance) असल्याचे सांगण्यात येत आहे. या आघाडीचं नाव INDIA ठेवण्याचा प्रस्ताव राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मांडला. त्यांच्या या कल्पकतेच प्रचंड कौतुक करत सर्व पक्षांनी याला अनुमोदन देत आगामी लोकसभा निवडणूक INDIA या नावाखाली लढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी दिली.

 

 

 

काँग्रेसला पंतप्रधानपदात रस नाही

काँग्रेसला सत्ता किंवा पंतप्रधानपदात रस नाही, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Congress President Mallikarjun Kharge) यांनी सांगितले. आपली राज्यघटना, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय यांचे रक्षम करण्याचा आमचा हेतू आहे. तसेच राज्य पातळीवर विरोधी पक्षांमध्ये मतभेद आहेत. मात्र हे मतभेद विचारधारेशी संबंधित नाहीत, असेही खरगे यांनी स्पष्ट केलं.

 

विरोधकांच्या ‘इंडिया’ची पुढची बैठक मुंबईत

मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं की, विरोधकांची पहिली बैठक (Opposition Parties Meeting ) पाटणा येथे पार पडली. त्यानंतर आज दुसरी बैठक बंगळुरूत होत आहे. विरोधकांच्या ‘इंडिया’ची पुढची बैठक महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Maharashtra Capital Mumbai) येथे होईल. आम्ही आता 26 पक्ष एकत्र आलो आहोत. आता आम्ही 26 पक्ष एकत्र आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि त्यांच्या भाजपाचे धाबे दणाणले आहेत. आमची ही बैठक पाहून त्यांनी 30 पक्षांची बैठक बोलावली आहे.

 

विरोधकांचा सरकारवर निशाणा

बंगळुरूमध्ये जमलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री (West Bengal CM) आणि तृणमूल काँग्रेसच्या मुख्य (Trinamool Congress chief) ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी म्हटले, ही एक चांगली आणि अर्थपूर्ण बैठक आहे. आज झालेल्या चर्चेनंतर निकाल या देशातील लोकांसाठी योग्य असू शकतो. तर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, सर्वजण मिळून भाजपचा पराभव करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

Web Title : Opposition Parties Meeting | in-the-upcoming-loksabha-election-2024-opposition-parties-along-with-
congress-have-formed-an-alliance-called-india

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा