Osmanabad Crime | 40 लाखांच्या दुतोंडी मांडूळाची विक्री करण्यासाठी आलेले 6 तस्कर गजाआड

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – दुतोंडी मांडुळाची (mandul) विक्री करण्यासाठी ग्राहकाच्या शोधात असलेल्या 6 तस्करांना (smugglers) उस्मानाबाद (Osmanabad Crime) येथे अटक करण्यात आली आहे. उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई (Osmanabad Crime) उस्मानाबाद बायपास रोडवर शुक्रवारी रात्री केली. आरोपींकडून 1 किलो 500 ग्रॅम वजनाचे मांडूळ जप्त केले असून या मांडूळाची किंमत सुमारे 40 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दीपक एकनाथ शिंदे (वय -35), विजय देवराम कटारणवरे (वय – 47), संदीप बाळासाहेब लोखंडे (वय -26), सुशांत बाळासाहेब गायकवाड (वय – 23 रा. नाशिक), अब्दुल आझम पटेल (वय – 61 रा. परांडा ता. परांडा जि. उस्मानाबाद), रामा भीमा कांबळे (वय -45 रा. बेगडा, ता. उस्मानाबाद) अशी अटक (arrest) करण्यात आलेल्या आरोपींची (Osmanabad Crime) नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील आरोपींना दुतोंडी मांडूळ सापडले होते.
हे मांडूळ विक्री करण्यासाठी ते उस्मानाबाद मध्ये मागील तीन दिवसांपूर्वी आले होते.
आरोपी मांडूळ विक्रीसाठी अब्दुल पटेल आणि रामा कांबळे यांच्या मदतीने बडा ग्राहक शोधत होते.
ग्राहक शोधण्याच्या त्यांचा प्रयत्न सुरू असताना ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेला (Local Crime Branch) मिळाली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे (Police Inspector Gajanan Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलंगेकर (API Nilangekar), पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माने (PSI Pandurang Mane) तसेच कर्मचारी जगदाळे, चव्हाण, ढगारे, ठाकूर, कोळी आणि अरब यांच्या पथकाने उस्मानाबाद बायपास रोडवर (Osmanabad Bypass Road) सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर आरोपींनी मांडूळ पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या कारवाईत 40 लाख रुपये किंमतीचे मांडुळ, आणि गुन्ह्यात वापरलेली 7 लाख रुपये किमतीची कार जप्त केली. आरोपींवर आनंदनगर पोलीस ठाण्यात (Anandnagar Police Station) वन्यजीव प्राणी संरक्षण अधिनियम कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक पांडुरंग माने करत आहेत.

 

Web Titel :- Osmanabad Crime | 6 smugglers come to sell 40 lakh antique snake

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dombivli Gang Rape Case | डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण ! आरोपींकडून अनेकदा कंडोमऐवजी प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर

Lonand Crime | धक्कादायक ! चक्क उद्घाटनादिवशीच ज्वेलरी शाॅपमध्ये चोरी, पुण्यातील महिलेसह दोघे ताब्यात

Pune Bangalore Expressway | पुणे-बेंगळुरू दरम्यान 40 हजार कोटीचा होणार नवा महामार्ग