उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ ; बालेकिल्ल्यातच ‘या’ कारणामुळे राष्ट्रवादीचा झाला ‘दणदणीत’ पराभव

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यात झालेल्या लढतीत ओमराजे निंबाळकर यांचा तब्बल १ लाख २७ हजार ५६६ मतांनी विजय मिळवला आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या चुरशीच्या लढतीत कोण निवडून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.अखेर या चुरशीच्या लढतीत शिवसेनेच्या ओमराजेंनी बाजी मारली

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमरगा सोडलं तर बाकीच्या सगळ्या विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेस – राष्ट्रवादीचा दबदबा असल्यामुळे आघाडीसाठी ही प्रतिष्ठेची लढत होती. जिकडे बार्शी तिकडे सरशी असे इथे म्हणले जात होते परंतु बार्शीमध्येच 50-50 मतदान झाले. औसा मतदारसंघाने ओमराजेंना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली.

उस्मानाबादमधील सहाही मतदारसंघात शिवसेनेला मताधिक्य मिळाले आहे. औसा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेला जास्त मते मिळाली, त्याचा फायदा ओमराजेंना मिळाला आहे. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीचा परिणाम मतदानावर झाला नसून शिवसेनेच्या कट्टर कार्यकर्त्यांची साथ ओमराजेंना लाभली.

ओमराजेंच्या विजयाची कारणे –
औसा येथे नरेंद्र मोदी यांची झालेली सभा,
तसेच देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या सभा
मित्रपक्षांनी दिलेली साथ, ओमराजेंचे आक्रमक नेतृत्व व वक्तृत्व
मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तळमळीने केलेला प्रचार

राणाजगजितसिंह पाटील यांच्या पराभवाची कारणे –
मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसची कारवी लागली मनधरणी
नवमदारांना खेचून आणण्यात आलेले अपयश
मोदींची असलेली सुप्त लाट
वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या मतांचा बसलेला फटका

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार – १९ लाख ०४ हजार ८५९ मतदार आहेत. त्यापैकी एकूण ११ लाख ९६ हजार १६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतदार संघात ६३.४२ % टक्के मतदान झाले होते. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अर्जुन सलगर यांना ८.१ ८ % मते मिळाली आहेत.

शिवसेनेचे मावळते खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला होता येत आहे. गेल्यावेळेस येथून राष्ट्रवादीचे नेते पदमसिंह पाटील यांचा पराभव करत शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड विजयी झाले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांचा पराभव केला होता. या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून ओमराजेंनी विधानसभेला झालेल्या पराभवाचा वचपा काढला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like