‘या’ 8 वर्षाच्या भारतीय मुलीनं ‘पृथ्वी’ वाचविण्याचं केलं ‘आवाहन’, 21 देशांमध्ये दिली ‘भाषणं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी हवामान बदलाच्या विरोधात आवाज उठविणारी भारतीय मुलगी लिसिप्रिया कंगुजमने आपल्या भाषणाने जगाला हादरवून टाकले. स्पेनची राजधानी मैड्रिड येथे सीओपी २५ व्या हवामान परिषदेमध्ये मणिपूरच्या या छोट्या पर्यावरण कार्यकर्तीने जागतिक नेत्यांना त्यांची जमीन आणि त्यांच्यासारख्या निर्दोष लोकांचे भविष्य वाचविण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आवाहन केले.

लिसिप्रिया ने मंगळवारी आपल्या भाषणात सांगितले की, “मी जागतिक नेत्यांना हे सांगण्यासाठी आली आहे की हे पाऊल उचलण्याची आता वेळ आली आहे कारण ही एक वास्तविक हवामान आणीबाणी आहे,” इतक्या लहान वयातच अशा एका महत्त्वाच्या विषयावर बोलल्यामुळे लिसिप्रिया स्पेनच्या वर्तमानपत्रांमध्ये चर्चेत आहे. स्पॅनिश वृत्तपत्रांनी भारतीय ‘ग्रेटा’ म्हणून तिचे कौतुक केले आहे. लिसीप्रियाचे वडील केके सिंह म्हणाले, “माझ्या मुलीचे बोलणे ऐकून ती फक्त आठ वर्षांची आहे याचा कोणालाही अंदाज आला नव्हता.”

आतापर्यंत २१ देशांचा केला आहे दौरा
लिसिप्रियाने आतापर्यंत २१ देशांना भेटी दिल्या आहेत आणि हवामान बदलाच्या मुद्दय़ावर विविध परिषदांमध्ये ती बोलली आहेत ती जगातील सर्वात तरुण पर्यावरणीय कार्यकर्ती असल्याचे म्हटले जाते.

या सम्मेलनामुळे बदलले आयुष्य
वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी लिसिप्रियाला २०१८ मध्ये मंगोलियामधील आपत्तीच्या मुद्दय़ावर मंत्री स्थरीय शिखर परिषदेत बोलण्याची संधी मिळाली होती. लिसीप्रिया म्हणाली, ‘या सम्मेलनाने माझे आयुष्य बदलले. जेव्हा आपत्तींमुळे मी मुलांना त्यांच्या पालकांपासून विभक्त होताना पाहते तेव्हा मला अश्रू अनावर होतात.’

वडिलांच्या मदतीने संस्था तयार केली
मंगोलियाहून परत आल्यानंतर लिसीप्रियाने आपल्या वडिलांच्या मदतीने ‘द चाइल्ड मूव्हमेंट’ नावाची संस्था स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी जागतिक नेत्यांना हवामान बदलांच्या विरोधात पावले उचलण्याचे आवाहन केले.

पीएम मोदींना ही केली विनंती
गेल्या वर्षी जूनमध्ये लिसीप्रिया संसद भवनाजवळ पोस्टर्स घेऊन आली आणि याद्वारे तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हवामान बदलांचा सामना करण्यासाठी कायदे करण्याची विनंती केली होती.

शाळा सोडावी लागली
लिसिप्रियाचा जन्म इम्फाळ येथे झाला असून ती बहुधा संपूर्ण वेळ शहराबाहेरच असते. ती जास्त करून दिल्ली आणि भुवनेश्वरमध्ये राहते. हवामान बदलाच्या प्रश्नावर तिची आवड असल्यामुळे ती शाळेत जाऊ शकली नाही. या कारणास्तव, तिने गेल्या फेब्रुवारीमध्ये शाळा सोडली.

स्पेन सरकारने केला खर्च
लिसिप्रियाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, मुलीला संयुक्त राष्ट्रांनी शिखर परिषदेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले होते. पण मग आम्ही विचार केला की स्पेनला जाण्याचा खर्च कसा सांभाळला जाईल? यासाठी बर्‍याच मंत्र्यांना ईमेलद्वारे मदतीसाठी विनंती केली गेली होती. पण काहीच उत्तर आले नाही. नंतर भुवनेश्वरमधील एका व्यक्तीने मैड्रिडसाठी तिकीट बुक केले. पण ३० नोव्हेंबरला मैड्रिडला रवाना होण्याच्या आदल्या दिवशी, एक ईमेल आला, ज्यामध्ये असे लिहिले होते की तिच्या १३ दिवसांच्या संपूर्ण प्रवास खर्च स्पेन सरकार उचलणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/