Blast in Afghanistan : अफगाणिस्तानमध्ये मोठा स्फोट, 5 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अफगाणिस्तानमधील घोर राज्यात मोठा स्फोट झाला आहे. हा स्फोट राज्यातील दावलत यार जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खाणीत झाला आहे. स्फोट झाल्याने एका कारमध्ये बसलेले पाच जण ठार झाले आणि अनेक जखमी झाले आहेत.

ADV

बुधवारी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्येही एक मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात शिक्षण मंत्रालयाच्या कर्मचार्‍यासह इतर पाच जण ठार झाले होते. कारमध्ये ठेवलेल्या स्फोटकांमुळे शिक्षण मंत्रालयाच्या वैज्ञानिक परिषदेचे संचालक अब्दुल बाकी अमीन यांचा या स्फोटात मृत्यू झाला होता. त्याचवेळी १५ लोक जखमी झाले होते.

तसेच ३ ऑगस्ट रोजी पूर्व अफगाणिस्तानमधील एका तुरुंगात आत्मघातकी कार बॉम्बस्फोट आणि बंदूकधार्‍यांनी हल्ला केला होता. अफगाण अधिकाऱ्यांनी सांगितले की, या हल्ल्यात २९ जण ठार आणि ५० जण जखमी झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी आयएस या दहशतवादी संघटनेने घेतली होती. प्रांताचे राज्यपाल अताउल्लाह खोगयानी यांनी सांगितले होते की, जलालाबादमध्ये अफगाण सुरक्षा दले आणि अतिरेक्यांमध्ये मोठी चकमक झाली होती.