ऑस्ट्रेलियामध्ये वाढला ‘कोरोना’चा प्रकोप, पुढील 6 आठवड्यांसाठी पुन्हा Lockdown लागू

मेलबर्न : पोलीसनामा ऑनलाइन – ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नसह विविध क्षेत्रात लॉकडाऊन पुन्हा लागू करण्यात आले आहे. मागील 24 तासात कोरोनाची 191 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यानुसार मेलबर्नसह व्हिक्टोरिया राज्याच्या अनेक भागात लॉकडाऊन 6 आठवड्यासाठी पुन्हा लागू करण्यात आले आहे.

लोकांना केवळ काही आवश्यक कामासाठीच घराच्याबाहेर पडण्याची परवानगी दिली आहे. या दरम्यान आवश्यक सामान खरेदी करणे, औषधे खरेदी करणे, व्यायाम आणि अभ्यासाच्या कामासाठीच लोकांना घराच्या बाहेर पडण्याची परवानगी आहे.

व्हिक्टोरियाच्या प्रीमियर डॅनियल अंड्रयूजने म्हटले की, सार्वजनिक आरोग्य पथकांनी तिसर्‍या टप्प्याच्या लॉकडाऊनचा सल्ला दिला आहे आणि काल मध्यरात्रीपासून पुढील सहा आठवड्यापर्यंत हे प्रभावी राहील. आता या स्थितीत अन्य कोणताही पर्याय नाही.

व्हिक्टोरियामध्ये कोरोनाची 722 अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांसह, आतापर्यंत 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. परतु मागील 24 तासात मृत्यूचे कोणतेही नवीन प्रकरण समोर आलेले नाही. या दरम्यान, न्यू साऊथ वेल्स 100 वर्षांमध्ये पहिल्यांदा व्हिक्टोरियासह आपली सीमा बंद करण्यासाठी तयार झाले आहे. पोलीस मंगळवारी मध्यरात्रीपासून दोन्ही राज्यांमध्ये 55 बोर्डरची देखरेख करण्यासाठी मेलबर्न आणि आजूबाजूच्या परिसरात गस्त घालणार आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाची 8,755 प्रकरणे

ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत कोरोनाची 8,755 प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर 106 लोकांचा मृत्यू आतापर्यंत या घातक व्हायरसमुळे झाला आहे.

जगभरात आतापर्यंत 1.16 कोटी लोकांना कोरोनाची लागण

जगभरात आतापर्यंत 1 कोटी 16 लाख 26 हजार 265 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर या घातक व्हायरसमुळे 5 लाख 38 हजार 172 लोकांचा मृत्यूसु÷द्धा झाला आहे. याशिवाय 63 लाख 4 हजार 328 लोक संसर्गातून बरे झाले आहेत.